शेखर सरतांडेल दिग्दर्शित ‘एक अलबेला’ चित्रपटात विद्या बालन सुप्रसिध्द अभिनेत्री गीता बाली ह्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. जेव्हापासून विद्या ही भूमिका करणार ही बातमी पसरलीय, तेव्हापासून ती नक्की दिसणार तरी कशी ह्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शेवटी तिचा आता First Look रिव्हील झाला आहे.
ह्या लूकबद्दल सांगताना चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल म्हणतात, “मला सुरूवातीपासूनच विद्या बालनमध्येच गीता बाली दिसत होत्या. गीता बाली ह्यांच्या चेह-यातला गोडवा विद्याच्याही चेह-यात आहे. त्यामूळे विद्याची लूक टेस्ट न करता तिची गीता बाली म्हणून कास्टिंग झाली. त्यानंतर चित्रपटासाठीही गीता बाली ह्यांचा कोणता लूक असावा ह्याविषयीही माझ्यात आणि मेकअप आर्टिस्ट विद्याधर भट्टे ह्यांच्यात एक वाक्यता होती. गीता बाली ह्यांची केसाची स्टाइलही त्यांच्या प्रत्येक फोटोमधून उठून आलीय. आणि विद्याची हेअरस्टाइलिस्ट शलाका भोसलेनेही गीता बालींच्या स्टाइलचा अभ्यास केल्याने आमच्यासमोर नक्की काय करायचंय, ते स्पष्ट होतं.”
शेखर सरतांडेल पूढे म्हणतात, “विद्याची ही पहिल्या दिवसाची हेअरस्टाइल आहे. हा लूक आम्ही पहिल्यादिवशी तिच्यासाठी केला. आणि लगेच शुटिंग केले सूध्दा. तीन गाण्यांसाठीचे तीन लूक तुम्हांला चित्रपटात पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे गीता बाली आणि भगवानदादा ह्यांच्या भेटीतले सेटवरच्या सीनमध्ये एक लूक आणि घरात वावरणारी गीता बालीचा एक लूक असे साधारण पाच ते सहा लूक तुम्हांला पाहायला मिळतील.”
विद्या बालनचा लूक अनविल झाल्यावर शेखरला अनेकांच्या शुभेच्छा आता येऊ लागल्यात. त्याबद्दल शेखर सांगतात, “माझे मराठी आणि बॉलीवूडमधल्ये मित्र, तसेच विद्याचे बॉलीवूड, बंगाली आणि इतर फिल्म इंडस्ट्रीतल्या मित्रपरिवाराकडून आम्हां दोघांवरही सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय.काही जणं तर अगदी तुम्ही ही फिल्म हिंदीत का नाही बनवतं असेही प्रश्न विचारतायत.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, विद्या बालनचा गीता बाली झाल्यावरचा लूक