आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Were Nervous While Doing Love Scenes In Sairat, Says Parsha Archi

‘शुटिंगवेळी एकमेकांचे हात पकडताना आम्ही खूप लाजत होतो’, सांगतायत परशा-आर्ची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैराट सिनेमातली बिटरगावची अर्चना पाटील म्हणजेच आर्ची आता उभ्या महाराष्ट्राला माहित झालीय. जिथे बॉलीवूड मधल्या नवोदित अभिनेते-अभिनेत्रींना आपली ओळख मिळवायला फिल्म आणि बॅनर निवडताना खूप विचार करायला लागतो. जिथे नॅशनल अवॉर्ड पटकावण्यासाठी काही वर्षांचं करीयर करावं लागतं. तिथे आर्चीची भूमिका साकारणा-या रिंकू राजगुरूला मात्र नेम आणि फेम आपला पहिला सिनेमा रिलीज होण्याअगोदरच मिळालंय.
नॅशनल अवॉर्ड तर मिळालाच, पण आता प्रसिध्दी एवढी मिळालीय. की साधं रस्त्यावरून चालणं मुश्किल होऊ लागलंय. रिंकु म्हणते, “मी खरं तर अभिनेत्री होणारच नव्हते. मला नृत्यात रस होता. पण आपल्या गावातलाच दिग्दर्शक नवी फिल्म बनवतोय. म्हणून सहज ऑडिशनला गेले. वाटलं, मिळेल एखादा साइड-रोल. दोन-चार मिनीटांचा रोल मिळाला, असता तरीही त्याचं अप्रुप वाटलं असतं. पण मुख्य भुमिका मिळाली. पाठोपाठ राष्ट्रीय पुरस्काराचा बहूमान मिळाला. आणि आता तर लोकं मला चक्क ओळखू लागलीयत. रस्त्यावरून चालणं मुश्किल झालंय.”
रिंकु अकलुजची आहे. ती जिजामाता शाळेत शिकते. ती सातवीत असताना तिने सैराटसाठी ऑडिशन दिली. आठवीत असताना फिल्मसाठी चित्रीकरण केलं. नववीत असताना फिल्मचं प्रमोशन सुरू झालं. आणि तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर आता फिल्म रिलीज होताना ती नववीतून उत्तीर्ण होऊन दहावीत गेलीय. रिंकु म्हणते, “हे सगळं स्वप्नवत आहे. इथून पूढे अभिनयासाठी काही ऑफर आली तर करायला माझी हरकत नसेल. पण माझं पूर्वीपासूनच डॉक्टर होण्याचं स्वप्न मी पूर्ण करेन, हे मात्र नक्की.”
रिंकुला डॉक्टर व्हायचंय. तर आकाश ठोसरला रेसलर व्हायचं होतं. रेसलिंगसाठी तो पाच वर्ष खडतर परिश्रमही घेत होता. पण आता सैराटने तो अभिनेता झालाय. आकाश म्हणतो, “माझ्या ध्यानीमनी नसताना मी अभिनेता झालो. आता इथून पूढे अजून चांगला अभिनेता होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. ही तर सुरूवात आहे.”
अद्याप आयुष्यात पहिलं प्रेम न अनुभवलेल्या रिंकु-आकाशला सिनेमात एकमेकांच्या प्रेमात पडायचं होतं. ते सगळ्यात मुश्किल असल्याचं ते सांगतात, “आम्ही तर एकमेकांचे हात पकडालाही लाजत होतो. त्यात चित्रीकरणावेळी वडिलधारी माणसं समोर होती. पण नागराजदादामूळे लव्हसीनच काय पण घोडसवारी, बंदूक चालवणं, बाइक चालवणं, अशा ह्याअगोदर कधीही न केलेल्या गोष्टी आम्ही केल्या.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आर्ची-परशाचा व्हिडीयो इंटरव्ह्यु