आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wedding Album Of Nach Baliye 7 Winner Amruta Khanvilkar And Himanshoo Malhotra

Wedding Album: अमृता-हिमांशूच्या लग्नाला 6 महिने पूर्ण, ही मराठी मुलगी आहे पंजाबी घराण्याची सून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृता आणि हिमांशू यांच्या लग्नातील छायाचित्रे... - Divya Marathi
अमृता आणि हिमांशू यांच्या लग्नातील छायाचित्रे...
मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर आणि दिल्लीचा मुंडा हिमांशू मल्होत्रा यांच्या लग्नाला आज सहा महिने पूर्ण झाले आहेत. गेल्याच आठवड्यात या जोडीने 'नच बलिये 7' चे विजेतपद आपल्या नावी करुन भरपूर प्रसिद्धी एकवटली आहे. याचवर्षी 24 जानेवारी रोजी ही जोडी लग्नगाठीत अडकली. लग्नाच्या सहा महिन्यांतच या दोघांचे नशीब चमकले आणि करिश्मा तन्ना-उपेन पटेल, रश्मी देसाई-नंदिश संधू यांसारख्या हिंदीतील नावाजलेल्या सेलिब्रिटींना मागे टाकत महाराष्ट्राच्या लेकी आणि जावईने हा मानाचा किताब आपल्या नावी केला. त्यामुळे साहजिकच या जोडीसाठी आजचा दिवस खासच आहे.
पंजाबी पद्धतीने झाले विवाहबद्ध
मुळची पुण्याची असलेल्या अमृताने दिल्लीचा रहिवाशी आणि पंजाबी असलेल्या हिमांशू मल्होत्राची आपल्या जोडीदाराच्या रुपात निवड केली. लग्नापूर्वी दहा वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. एमबीए केलेल्या हिमांशू आणि अमृताची भेट ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार..’ या शोमध्ये झाली होती. याच शोमध्ये या दोघांचे सूर जुळून आले होते. 24 जानेवारी रोजी पंजाबी पद्धतीने विवाहबद्ध झाली. दिल्लीत दोघांचा विवाहसोहळा रंगला होता.
लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी अमृताच्या हातावर मेंदी रचली होती. सोबतच हळदीचा कार्यक्रमसुद्धा मोठ्या थाटात पार पडला होता. कुटुंबीयांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने अमृताला हळद लागली. या कार्यक्रमात अमृता आणि तिच्या कुटुंबीयांनी खूप एन्जॉय केले. त्यानंतर लग्नाच्या एका दिवसाआधी म्हणजेच 23 जानेवारीला या दोघांची संगीत आणि कॉकटेल पार्टी रंगली. या लग्नात अमृता आणि हिमांशूच्या कुटुंबीयांसोबत हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
आज अमृता आणि हिमांशूच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पाहुयात या दोघांचा वेडिंग अल्बम... यामध्ये अमृताच्या मेंदी, हळद, संगीतापासून ते लग्नापर्यंतच्या छायाचित्रांचा समावेश आहे.