(शशांक आणि तेजश्रीच्या लग्नाची छायाचित्रे)
तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेला श्री अर्थातच अभिनेता शशांक केतकरचा आज वाढदिवस असून त्याने
आपल्या वयाची 29 वर्षे पूर्ण केली आहेत. शशांकसाठी यंदाचा वाढदिवस खूप स्पेशल आहे. कारण लग्नानंतरचा शशांकचा हा पहिलाच वाढदिवस असून तो पत्नी तेजश्रीसह यंदाचा हा खास दिवस साजरा करत आहे.
पडद्यावरची शशांक-तेजश्रीची जोडी यावर्षी खर्या आयुष्यात कायमस्वरूपी
विवाहबंधनात बांधली गेली. ‘होणार मी सून ह्या घरची’ या मालिकेत काम करताना दोघांचेही प्रेम जमले आणि त्यास 8 फेब्रुवारी 2014 रोजी सातजन्माच्या सोबतीचे सोनेरी कोंदण लाभले. पुण्यात मोजक्याच आप्तेष्ट, सहकलाकारांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने लग्न करून श्री आणि जान्हवी विवाहबंधनात अडकले. प्रधानांची तेजश्री केतकरांच्या घरची सून झाली आणि आवडता लक्ष्मीनारायणाचा जोडा लग्नबंधनात अडकल्याने प्रेक्षकही सुखावले आहेत.
तेजश्री ही मुंबईतील डोंबिवलीची तर श्री पुण्यातला. दोघांचीही पहिली भेट ‘होणार सून’ मालिकेच्या सेटवर झाली. मालिकेत प्रियकर व प्रेयसी आणि नंतर पती-पत्नीची भूमिका साकारत असताना दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले आणि त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात विवाह करण्याचा निर्णय घेतला. श्री आणि जान्हवी यांच्यात चांगल्या प्रकारचा समन्वय साधला गेल्याने तसेच मालिकेतील इतर टीमचीही त्यास योग्य साथ मिळाल्याने अल्पावधीत ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी मालिकेची सर्व टीम उपस्थित होती.
आज शशांकच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याच्या लग्नाचा खास अल्बम दाखवत आहोत. यामध्ये तुम्हाला शशांक आणि तेजश्रीच्या लग्नाची आणि त्यांच्या वेडिंग रिसेप्शनची छायाचित्रे बघता येणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शशांक-तेजश्रीच्या आयुष्यातील खास क्षण...