आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : नवरी नटली... सरू मावशीला गवसला जोडीदार, 'होणार सून...'मध्ये झाले शुभमंगल सावधान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी 'होणार सून मी ह्या घरची' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची बातमी आम्ही नुकतीच तुम्हाला दिली आहे. आता मालिका संपणार म्हटल्यावर त्यातील अनेक गोष्टी आता पटापटा घडताना दिसणार आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे श्रीच्या सरु मावशीचे लग्न. अनेक वर्षांपासून लग्नासाठी आसुसलेली सरु मावशी आता बोहल्यावर चढणार आहे. पुढच्या आठवड्यात सरु आणि पप्पू उर्फ प्रद्युम्न यांचा लग्नसोहळा प्रसारित होणार आहे.

प्रद्युम्न काही महिन्यांपूर्वी सरू मावशीला बघायला आलेला असतो. परंतू त्याच्या घरातील लोकांचा स्वभाव न पटल्यामुळे लग्नाची बोलणी पुढे सरकत नाही. आता ब-याच दिवसांनी प्रद्युम्न जान्हवीला भेटतो तेव्हा सरूचे अजून लग्न झालेले नसल्याचे त्याला कळते. दरम्यान पप्पूलाही मनासारखी जोडीदार न मिळाल्याने त्याचेही लग्न झालेले नाहीये. यामुळे प्रद्युम्न परत एकदा सरूशी लग्न करण्याची इच्छा जान्हवीकडे बोलून दाखवतो.
श्री आणि जान्हवी हे लग्न करण्याचा घाट घालतात. गोखले कुटुंबात या लग्नावरून विरोध असला तरी श्री आणि जान्हवी सरू मावशीच्या आनंदासाठी घरच्यांची संमती मिळवण्यात यशस्वी होतात आणि हे लग्न निर्विघ्नपणे पार पडते. येत्या आठवड्यात सरू मावशीच्या लग्नाचा हा भाग बघायला मिळणार आहे. अभिनेता समीर चौगुलेने प्रद्युम्नची ही व्यक्तिरेखा साकारली आहे.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला प्रद्युम्न आणि सरु मावशीच्या लग्नाची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...