आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Filmmaker Ravi Jadhav\'s Mumbai Based Beautiful Office

It\'s Pure and Simple: पाहा दिग्दर्शक रवी जाधव यांच्या नवीन ऑफिसची खास झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या आफिसमध्ये पत्नी मेघना जाधवसोबत रवी जाधव, इतर छायाचित्रांमध्ये ते आपले सहकारी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत दिसत आहेत.)

जाहिरात क्षेत्रातल्या प्रदीर्घ अनुभवानंतर मराठी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत प्रसिध्दीस आलेले नाव म्हणजे, रवी जाधव. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी जाहिरात क्षेत्र गाजवलंच आणि चित्रपट दिग्दर्शन माध्यमातही यशस्वी पदार्पण केले. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, 'बीपी', 'टाइमपास'सारख्या कलात्मक दर्जेदार सिनेमांच्या त्यांनी केलेल्या दिग्दर्शनाला मराठीसोबत अमराठी प्रेक्षकांनीही मनमुराद दाद दिली. नेहमीच वेगळा विचार घेऊन दर्जेदार कलाकृती साकारणारे लेखक-दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'मित्रा' या लघुपटाला 62 व्या राष्ट्रीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार घोषित झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रवी जाधव आपल्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करायला विसरले नाहीत.
'मिडल क्‍लास' मराठी कुटुंबातून पुढे आलेला हा तरुण आपल्या कर्तृत्वाने जाहिरात क्षेत्रानंतर आता मराठी सिनेसृष्टीसुद्धा गाजवत आहे. त्यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात स्वतःचे नवीन ऑफिस घेतले. पत्नी मेघनाच्या पाठिंब्याने हे शक्य झाल्याचे रवी सांगतात. अलीकडेच त्यांनी आपल्या या नवीन ऑफिसची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत आपला एक अनुभवसुद्धा चाहत्यांना सांगितला. रवी जाधव म्हणाले, ''ऑगस्ट 2008 मध्ये अॅडव्हर्टायजिंग एजन्सीचे ऑफिस सोडले, त्यावेळी घरच्यांना खूप टेंशन आले होते. केवळ मी आणि मेघना आमच्या निर्णयावर ठाम होतो. नोव्हेंबर 2014 ला मी आणि मेघना आमच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये शिफ्ट झालो. खरंच हा अल्बम तयार करायला खूप श्रम लागले व वेळ लागला.''
'अथांश कम्युनिकेशन्स अँड रवी जाधव फिल्म्स' या आपल्या प्रॉडक्शनच्या हाऊसच्या नवीन ऑफिसला त्यांनी 'इट्स प्युअल अँड सिंपल' असे म्हटले आहे. इतकेच नाही तर 'अथांश कम्युनिकेशन्स' या नावामागचा इतिहासही त्यांनी सांगितला. रवी जाधव म्हणाले, ''29 डिसेंबर 2006ला नागाव, अलिबाग येथे माझ्या फार्म हाउसला गेलो होतो. 'अथर्व' आणि 'अंश' बीचवर खेळत होते. सहज म्हणून दोघांचे नाव एकत्र करून वाळूत 'अथांश' असे लिहिले. तेव्हा माहित नव्हते कr पुढे जाऊन 'अथांश कम्युनिकेशन्स' ही आमची कंपनी नटरंग, बालक पालक, टाइमपास, मित्रा व टाइमपास 2 या सिनेमांची निर्मिती करणार आहे...''
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला शुन्यातून विश्व निर्माण करणा-या रवी जाधव यांच्या अथांश कम्युनिकेशन्सच्या नवीन ऑफिसची खास झलक दाखवत आहोत. रवी आणि त्यांच्या पत्नी मेघना यांनी अतिशय सुंदररित्या ते सजवले आहे.
(सर्व फोटो साभारः दिग्दर्शक रवी जाधव यांचे फेसबुक अकाऊंट)