आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : बारावीत नापास झाला होता हा फेमस अॅक्टर, ठरवून होऊ दिले नाही स्वतःचे मुलं

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी गीतांजलीसोबत अतुल कुलकर्णी - Divya Marathi
पत्नी गीतांजलीसोबत अतुल कुलकर्णी
अतुल कुलकर्णी हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव. एक विचारवंत अभिनेता म्हणून ओळखले जाणारे अतुल कुलकर्णींनी यांनी 10 सप्टेंबर रोजी वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत.  सात भाषांमध्ये 70 हून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अतुल आता निर्मातेसुद्धा आहेत. सध्या ते त्यांच्या आगामी 'मणिकर्णिका' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटात कंगना रनोटची प्रमुख भूमिका असून अतुल यांनी तात्या टोपेंची भूमिका साकारली आहे. अतुल यांचे लग्न अभिनेत्री गीतांजली यांच्यासोबत झाले आहे. दोघांचे लव्हमॅरेज असून त्यांच्या लग्नाला 21 वर्षे झाली आहेत. गीतांजली आणि अतुल यांना मुलं नाही. विशेष म्हणजे या दोघांनी ठरवून स्वतःचे मुलं होऊ दिलेले नाही. याविषयी अतुल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांचे खासगी आयुष्य आणि करिअरविषयी... 

खासगी आयुष्य... 
अतुल कुलकर्णी मुळचे कर्नाटकचे असून सोलापुरात ते लहानाचे मोठे झाले. 10 सप्टेंबर 1965 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये पूर्ण केले. अतुल यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. मात्र अभियांत्रिकीमध्ये मन न रमल्यामुळे नंतर सोलापुरातील डी.ए.वी. महाविद्यालयातून इंग्रजी सहित्य या विषयात बी.ए. पूर्ण केले.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, बारावीत नापास झाले होते अतुल आणि बरंच काही... 
बातम्या आणखी आहेत...