आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एक डाव भुताचा’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘रेशीमगाठी’ सिनेमांचे दिग्दर्शक रविन्द्र नमाडे यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘एक डाव भुताचा’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘रेशीमगाठी’ आदि यशस्वी सिनेमांचे दिग्दर्शक रविन्द्र विश्वनाथ नमाडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील त्यांच्या राहत्या घरी नुकतंच निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. रविन्द्र नमाडे यांच्या निधनाने कुशल दिग्दर्शक आणि चांगला माणूस हरपल्याची भावना मराठी चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे.
‘एक डाव भुताचा’ या त्यांच्या सिनेमाने चांगल यश मिळवलं. या चित्रपटाला राज्य शासनाचे १२ व या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी रविन्द्र नमाडे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासोबत ‘दिवार’, ‘त्रिशूल’, ‘काला पथ्थर’, ‘सिलसिला’ या सिनेमांसाठी रविन्द्र नमाडे यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होत.