आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्या Hot Tv Actressला का फुटलं सर्वांसमोर रडू? कसं सावरलं तिला गोपीबहू आणि इच्छाने? वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टिव्ही मालिकांमधलं परिचीत नाव म्हणजे, अभिनेत्री अदा खान. राजकुमारी अम्रित बनून लोकांच्या डोळ्यात पाणी आणणारी निगेटीव्ह ओ्भूमिकेतली ही अभिनेत्री एका कार्यक्रमात मात्र स्वत:च खूप भावूक झाली. आणि सर्वांसमोर रडू लागली.
कँसर पेशन्टच्या आर्थिक मदतीसाठी विश्वास ह्या समाजसेवी संस्थेने एक कार्यक्रम ठेवला होता. आणि काही टीव्ही सेलेब्सना त्यामध्ये खास आमंत्रण दिलं होतं. त्यात रागिनी खन्ना, अदा खान, टीना दत्ता, जिया माणिक, मृणाल सेन ह्या टीव्ही सेलेब्सना बोलावलं होतं.
कॅंसर पेशन्टविषयी बोलताना अदाने कँसरची भीतीदायक सावली तिच्या आयुष्यवर कशी पडली ह्याविषयी सांगताना आपला अनुभव सगळ्यांना सांगितला. ती म्हणाली, “कॅंसर काय असतो, त्याची भयाणता मला चांगलीच ठावूक आहे. कारण माझ्या आईलाही कँसर झाला होता. तिला होणारा त्रास मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. माझ्या आईला स्वादूपिंडाचा कॅंसर झाला होता. त्यावर उपचार केला, पण तो कॅंसर नंतर तिच्या यकृतापर्यंत पसरला. आणि त्यातच ती गेली. माझी आई दोन वर्षांपूर्वी कँसरने गेली. जेव्हा जेव्हा मी ह्याविषयी बोलते मी खूप भावूक होते. ”
बोलता बोलता अचानक अदाचा गळा दाटून आला. आणि मग तिला शेजारी उभ्या असलेल्या जीया माणिक आणि टीना दत्ताने सावरलं.
टीनाने सूध्दा आपल्या घरातलाच अनुभव सांगितला, “माझ्या आजोबांना बोनमॅरो कँसर झाला होता. आणि त्यांना प्रचंड त्रास व्हायचा. त्यावेळी आजोबांच्या कॅंसरने आई पूरती खचली होती. तिला तिच्या वडिलांना अशा अवस्थेत पाहवतं नव्हतं. आजोबा कॅंसरनेच वारले.”
रागिणी खन्नानेही आपल्या मैत्रिणीच्या आईला झालेल्या कॅंसरच्या आठवणी सांगितल्या. एकूणच वातावरण दाटून आले होते. नेहमी टीव्ही पडद्यावर बाहूलीसारख्या दिसणा-या ह्या नायिकांच्या आयुष्यातल्या दु:खाची किनार फार क्वचित समोर येते.
कोण देणार कॅंसर पेशन्टना एअर अँब्युलन्स