आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#1YearOfSairat : 'बाहुबली'ने 'सैराट'ला का मारले! वाचा यामागची खास कारणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
29 एप्रिल 2016 हा दिवस मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. त्याचे कारण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेला 'सैराट' हा सिनेमा याच दिवशी रिलीज झाला. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'ने घडवलेला इतिहास सर्वश्रूत आहे. या सिनेमामुळे चित्रपटसृष्टीला आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु हे दोन हरहुन्नरी कलाकार दिले. या जोडीने लहानांपासून ते मोठयांपर्यत सगळ्यांनाच याडं लावलं. या सिनेमासाठी लोक एवढे वेडे झाले, की ते जिथे तिथे फक्त 'सैराट'चीच चर्चा झाली. पण आता मात्र लोकांना 'सैराट' नावाच्या वादळाचा विसर पडला की काय असं दिसून येतंय आणि याला कारणीभूत ठरला आहे 'बाहुबली 2' हा सिनेमा... काय आहेत यामागची कारणे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आम्ही या पॅकेजमधून केला आहे.  
 
'बाहुबली 2'चा विक्रम... 
29 एप्रिल रोजी 'सैराट'च्या रिलीजला एक वर्ष पूर्ण झालंय. याच्या एका दिवसाआधीच म्हणजे 28 एप्रिल रोजी 'बाहुबली 2 : द कन्क्ल्यूजन' हा सिनेमा रिलीज झाला. 'कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी प्रेक्षक एवढे आतुर झाले, की त्यांना 'सैराट' नावाच्या वादळाचा चक्क विसर पडला. वर्षभर सोशल मीडियावर झालेली 'सैराट'ची चर्चा 'बाहुबली 2'च्या रिलीजनंतर अचानक बंद झाली आणि प्रेक्षक कटप्पाने 'बाहुबली'ला मारले या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यात गुंतून गेले. जर 'बाहुबली 2' हा सिनेमा याकाळात रिलीज न होता काही दिवसांनी झाला असता, तर कदाचित लोक आजही 'सैराट'चीच चर्चा करताना दिसून आले. पण असे घडले नाही. आजवर एखाद्या बॉलिवूड सिनेमाची जेवढी चर्चा झाली नाही तेवढी 'बाहुबली'ची होताना दिसतेय. 'बाहुबली 2'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल 115 कोटींची कमाई करत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.  

'बाहुबली'समोर प्रेक्षकांना 'सैराट'चा विसर पडायला नको होता, कोण म्हणतंय असं वाचा पुढील स्लाईडवर...
 
हेही वाचा... 
#1YearOfSairat: बघा शूटिंगच्या फावल्या वेळेत क्लिक झालेले 'सैराट'च्या टीमचे फोटोज
#1YearOfSairat: वाचा, 'सैराट'च्या वर्षपुर्तीच्या निमित्ताने काय म्हणताहेत आर्ची-परशा, सल्या
#1YearOfSairat: हे आहे प्रेक्षकांना 'सैराटमय' करणा-या अभिनेत्रीचे खरे घर, बघा एक्सक्लूझिव्ह झलक
'सैराट' वर्ष : असे होते, याड लावलेल्या या चित्रपटाचा सर्वेसर्वा नागराज मंजुळेंचे पूर्वायुष्य
 
बातम्या आणखी आहेत...