आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Will Janhavi\'s Mom Make A Fuss In Naming Ceremony In Honar Sun Mi Hya Gharachi

जान्हवीच्या आईचं दुखतंय डोकं, बारशाच्या दिवशी शिजतायत का डोक्यात कारस्थान?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘होणार सून मी ह्या घरची’मालिकेत सगळेजणं सजले-नटले होते. जान्हवीच्या बाळाचं बारसं होतं. त्यामुळे गोकुळ बंगल्यातला उत्साह ओसंडून वाहत होता. आणि अशावेळेस जान्हवीच्या आईची एन्ट्री झाली. आता सुखात मिठाचा खडा टाकायची शशीकला बाईंची ‘जित्याची खोड..’ म्हटल्यावर स्वत:च्या मुलीच्या बारशात आता ह्या काय करतायत, ही उत्सुकता चाळवली नसती तरच नवल.
पण ‘कला’विषयी अभिनेत्री आशा शेलार म्हणतात,”नाही, आता मालिका संपताना शशिकलाची व्यक्तिरेखा खूप सकारात्मक झालीय. त्यामूळे शेवट गोड होणार, काही कारस्थान होणार नाहीत. माझं मात्र गेले एकवीस दिवस डोकं दुखतंय. का दुखतंय ह्याचा शोध घेतल्यावर लक्षात आलं. आता मालिका संपताना मनात व्यापलेलं रिकामपणं ह्याला कारणीभूत आहे.”
त्या आपल्या भुमिकेविषयी आणि मालिकेविषयी सांगताना पूढे म्हणतात, “मी खरं तर रंगभुमीशी जास्त निगडीत असलेली अभिनेत्री. मंदारने जेव्हा ह्या मालिकेत शशिकलाची भुमिका दिली, तेव्हा कौटुंबिक नाट्य सुंदर रितीने हाताळणा-या ह्या दिग्दर्शकाला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. मालिका सुरू झाली तेव्हा शशिकला कितपत खाष्ट आहे, हे समजतं नव्हतं. पण लोकांनी शशिकलाला डोक्यावर घेतलं. त्यामूळे ह्या खर तर, छोट्या व्य्कतिरेखेची व्याप्ती वाढली. लोकांनी ह्या व्यक्तिरेखेला आपलंस केलं, त्यामुळे ही व्यक्तिरेखा यशस्वी झाली.”
नकारात्मक भुमिकेच्या यशाचं गमक विचारल्यावर त्या म्हणतात,”शशिकलाच्या कारवाया लोकांना खटकायच्या पण हव्याहव्याशा वाटायच्या. आपल्या घरात भांडणं होऊ नयेत, असं वाटतं असलं तरीही दुस-याच्या घरातली भांडणं ऐकायला आवडतात, हा मानवी स्वभाव असल्याने असं असावं कदाचित. काहीही कारणं असोत, पण ह्या अडीच-तीन वर्षांच्या काळात आम्ही लोकांचे जणू शेजारी झालो होतो, हे मात्र खरं. शेजा-यांवर प्रेम करावं, तसं त्यांनी आमच्यावर प्रेम केलंय. आता मात्र बस्तान बांधायची वेळ आलीय. त्यामुळेच कदाचित मनात संमिश्र भावना आहेत. इथून पुढचा प्रवास कसा असेल, हे ठाऊक नाही. पण लोकांचं हे प्रेम टिकून ठेवायची धडपड नक्कीच असेल.”
पुढील स्लाइडमध्ये, पाहा, फोटो, जान्हवीची आई आलीय, नातीच्या बारशाला