आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

World Music Day: बाळासाहेबांसमोर बालपणी सादर केला होता पोवाडा, अजय-अतुलचा असा आहे प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: आज वर्ल्ड म्युझिक डे आहे. 21 जून हा दिवस प्रत्येक वर्षी जगभरात साजरा केला जातो. गायक आणि म्यूझशियन्सच्या सन्मानाचा दिवस म्हणून या दिवसाची ओळख आहे. आजच्या या खास दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी जोडी अजय-अतुल यांच्या प्रवासाविषयी सांगत आहोत.  
 
अजय-अतुल हे नाव ऐकले, की आपल्या डोळ्यांसमोर अनेक गाजलेल्या गाण्यांची यादी उभी राहते. महाराष्ट्रातील लोकसंगीत ज्याप्रकारे या दोघांनी चित्रपटाच्या मातीतून मनामनात रुजवले तसे आजवर संगीतकारांना जमले नाही. या दोघांनी मराठीबरोबरच हिंदीतही यशाची पताका फडकावली. अगदी शून्यातून सुरुवात करत संगीत क्षेत्रात साम्राज्य निर्माण करण्याचे काम अजय अतुल यांनी केले आहे. लहानपणापासूनच या दोघांची कारकीर्द एकमेकांसोबत राहिलेली आहे. अजय अतुल यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत. तरीही त्यांनी जोडीच्या नावात आधी अजय ठेवले आहे. त्यामागेही संगीताशी जुळलेलेच कारण आहे. ते कारण म्हणजे नावाचा रिदम चांगला वाटावा म्हणून त्यांनी जोडीचे नाव अजय-अतुल ठेवले. 
 
बालवयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर केले होते पहिले सादरीकरण...
अगदी सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या या भावांनी संपूर्ण देशाला आपल्या संगीताच्या तालावर थिरकायला भाग पाडले आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही या संगीतकार जोडीने आपले नाव उंचावले आहे. अनेक स्टेज परफॉर्मन्स या जोडीने दिले आहे. मात्र या दिग्गज संगीतकार जोडीने आपल्या आयुष्यातील पहिला परफॉर्मन्स कधी आणि कुणापुढे दिला, हे तुम्हाला ठाऊक आहे का? अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या पहिल्या स्टेज परफॉर्मन्सचा किस्सा अतिशय रंजक आहे. अगदी बालवयातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणाची संधी या भावांना मिळाली होती.
 
काय घडले होते त्यावेळी नेमके जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...