आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wrap Up For Sujay Dahake\'s Marathi Sci fi Film Phuntroo

Wrap Up: मराठीतली पहिली Sci-Fi फिल्म झाली पूर्ण, पाहा, फिल्मचे Behind Scene Photo

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुजय डहाके दिग्दर्शित मराठीतल्या पहिल्या Sci-Fi फिल्म 'फुंतरू'चे चित्रीकरण नुकतेच पुण्यात पूर्ण झाले. ऑगस्ट महिन्यात ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली होती. तेव्हापासून रात्रीचा दिवस करून ब-याचदा सुजयने आपल्या चित्रीकरणाचे काम झपाट्याने पूर्ण करायला सुरूवात केली होती. पुण्याच्या गोखले इन्टिस्टयुट, सासवड आणि आलिबागमध्ये ह्या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. आता ही फिल्म पुढच्या वर्षी १२ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
एका मेकॅनिकल इंजिनिअरींगचा विद्यार्थी एक अद्भूत रोबोट बनवतो. ह्या स्त्री रोबोटच्या तो प्रेमात पडतो.अशी चित्रपटाची कथा आहे. ही एक लव्हस्टोरी असल्याकारणाने व्हॅलेन्टाईन डेच्या दोन दिवस अगोदर चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय इरॉस इंटरनॅशनलने घेतला आहे. ‘लव्ह कॅन फाइंड यू इन मेनी वेज’ ही चित्रपटाची टॅग लाइन आहे.ह्यात ह्या मेकॅनिकल इंजिनिअर मुलाची भूमिका मदन देवधरने केली आहे. तर रोबोट बनलीय, अभिनेत्री केतकी माटेगांवकर.
केतकीचे ह्या चित्रपटातले कपडे आणि तिचा मेकअप ह्यावर जास्त मेहनत घेण्यात आलीय. विनोद सरोदेने केतकीचा लूक डिझाइन केलाय. तर आयुषी दगडने तिचे कॉस्च्युम डिझाइन केलेत. केतकीने ह्यातल्या भुमिकेसाठी सहा किलो वजन वाढवल्याचेही बोलले जातेय.
आपल्या पहिल्या-वहिल्या मराठी फिल्म निर्मितीविषयी बोलताना इरॉसच्या क्रिशीका लुल्ला म्हणतात,” फुंतरू ही मराठी फिल्म असली तरीही मोठ्यात मोठ्या हिंदी फिल्मला टक्कर देण्याच्या ताकदीची आहे. फुंतरूची संहिता, दिग्दर्शन, आणि निर्मिती मुल्य आंतरराष्ट्रीय पातळीची असल्याचे ही फिल्म पाहिल्यावर तुम्हांला जाणवेल. फुंतरू चित्रपटाच्या स्टारकास्टसोबत ही Sci-Fi फिल्म बनवण्याचा आमचा अनुभव अविस्मरणीय होता.”
चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाके म्हणतो, “मराठीतली पहिली साय-फाय फिल्म बनवण्याची जबाबदारी खूप मोठी होती. काम अवघड होतं.सलग १५ रात्री आणि नंतर २८ दिवस अशा पध्दतीने शिफ्ट्समध्ये आम्ही काम पूर्ण केले. ब-याचदा मी सहकलावंतांना खूप प्रेशरमध्ये काम करायला लावलं. पण केवळ त्यांचा सपोर्ट होता, म्हणून वेळेत फिल्म चित्रीत झाली. क्रिशीका लुल्ला ह्यांनीही पूर्ण आर्थिक पाठबळ दिलं. त्यामुळे अशी महत्वाकांक्षी फिल्म पूर्ण होऊ शकली. नव्या टीमसोबत, नव्या कलाकारांसोबत काम केलंय. पण त्यांची तयारी पाहून वाटतंय, वर्षानुवर्ष सिनेमामध्ये ते काम करतायत.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ह्या केतकी माटेगांवकरचे ह्या चित्रपटाते मॅजिकल शूज कसे बनले?