‘होणार सून मी ह्या घरची’ मालिका बंद होऊन आता पंधरा दिवस होऊन गेलेत. आणि नुकतंच ‘होणार सून’च्या संपूर्ण युनिटसाठी निर्माता मंदार देवस्थळीने एक छान रॅप अप पार्टीचं आयोजन केलं होतं. एकिकडे एकमेकांना २० दिवसांच्या दूराव्यानंतर भेटल्यावरचा खास आनंद ओसंडून वाहत होता. तर दूसरीकडे मंदारच्या टेलिव्हीजनविश्वातल्या कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण झाल्याने ह्या पार्टीत सर्व कलाकारांच्या चेह-यावर एक वेगळाच उत्साह दिसून येत होता.
पार्टीमध्ये मंदार देवस्थळीने सगळ्यांना मालिकेची चिरंतन आठवण राहावी म्हणून एक छान ट्रॉफी दिली. अनौपचारिक आठवणींना उजाळा आला. आणि पार्टी संपल्यानंतर आता पून्हा कधी? चं प्लॅनिंग रंगत होतं. मालिकेचा हिरो शशांक केतकरने आपल्या मालिकेतल्या सहाही आईंना आपली आठवण राहावी, म्हणून पार्टीतून घरी जाताजाता एक-एक भेट दिली.
काय भेट होती? असं विचारल्यावर शशांक म्हणाला, “मी माझ्या सहाही आईंना एक-एक साडी दिलीय. मी आणि माझ्या आईने मिळून हे शॉपिंग केलंय. माझ्यासाठी ही मालिका खूप खास होती. ह्या मालिकेने मला ओळख दिली. त्यामूळे माझ्या टेलिव्हिजनवरच्या सहाही ‘गोखले’ आईंना मी ही प्रेमाची एक छोटी भेट दिलीय. माझ्या आईची ह्या सहाजणींशी छान गट्टी जमलीय. त्यामूळे कोणाची काय आवड, आणि कोणाला कोणते रंग शोभून दिसतील, हे तिला पक्कं माहित आहे. मालिका संपताना शेवटच्या दिवशी आई सेटवर आली होती. आणि तिने सगळ्यांसाठी पुरणपोळी आणि गुलाबजाम बनवून आणले होते. आता जाताजाता आठवण म्हणून ह्या सहा आईंसाठी साड्या आणि मंदारदादा, केदार, प्रसाद ओक ह्या काही जवळच्या मित्रांसाठी मी शर्ट्स गिफ्ट म्हणून द्यायला आणले होते.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशी रंगली होणार सून मी ह्या घरचीची रॅप-अप पार्टी
(फोटो - स्वप्निल चव्हाण)