आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wrap Up Party On Last Day Of Shoot On Set Of Tv Serial Dil Dosti Duniyadari

सेटवर झाली \'दिल दोस्ती दुनियादारी\'ची Wrap Up Party,पाहा, सेलिब्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी सेटवरचं एक छोटेखानी रॅप-अप पार्टी युनिटने साजरी केली. दिल दोस्ती दुनियादारी लिहीलेला केक आणण्यात आला होता. मालिकेच्या लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, अभिनेत्यांची उपस्थिती ह्या पार्टीत होती.
अभिनेत्री पूजा ठोंबरे ह्या सेलिब्रेशनविषयी सांगते,“सगळ्यांनाच शेवटच्या दिवशी वाईट वाटत होतं. आमची जेवढ टीम आहे, ती सगळी शेवटच्या दिवशी सेटवर होती. आम्ही इथल्या फेमस बेकरीवरून आमच्यासाठी आमच्या फेवरेट फ्लेवरचा केक आणला होता. शिवाय आमचे दिग्दर्शक विनोद लवेकर आमच्यासाठी केक घेऊन आले होते. असं सेलिब्रेशन, एकमेकांसोबत राहणं आणि गोडधोड खाणं हे दिवसभर चालू होतं.”
"गेले एक वर्ष ‘दिल दोस्ती…’ मालिका अनेक प्रेक्षकांच्या आयुष्यातला एक महत्वाचा हिस्सा बनली होती. त्यामूळे आता मालिका संपल्यावर सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ह्याविषयी हळहळ व्यक्त होत असल्याचंही पूजा सांगते, “जेव्हापासून हे कळलं की, दिल दोस्ती दुनियादारी बंद होतेय. तेव्हापासून लोकांच्या ह्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रतिक्रिया सुरू आहेत. का बंद करताय? नका बंद करू, असं सगळेच म्हणतायत.”
“मालिका सुरू झाल्यापासून एना माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा हिस्सा बनलीय. त्यामूळे ह्या व्यक्तिरेखेला तर मी कधीच विसरू शकणार नाही. एनामध्ये जी निरागसता आहे, ती माझ्यातही यावी, असं मला नेहमी वाटतं. एना खूप खरी आहे. तसं खरं राहण्याचा माझाही प्रयत्न असतो. लोकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं. त्या प्रेमाची परतफेड म्हणून लवकरच दूसरा सिझन घेऊन आम्ही येऊ.”
पूजासारखंच सुव्रत जोशीसाठी ही सुजय साठ्ये ही व्यक्तिरेखा खूप खास आहे. तो म्हणतो, “मला सुजय ही व्यक्तिरेखा ह्या कारणासाठी जवळची वाटते, कारण ती माझी ह्या लोकप्रिय माध्यमातली पहिली भूमिका आहे. सुजयचा साधेपणा मला खूप आवडला. आमचे कुठलेही फोटो, पोस्ट टाकली की, सध्या आमचे चाहते आमची मालिका संपल्याबद्दल नाराजी आणि दु:ख व्यक्त करतायत. पण जसा शेतकरी दोन पिकांच्यामध्ये एक हंगाम कोरडा घेतात. कारण जमीनीची मशागत आवश्यक असते. तसाच आमचा हा काही काळ कोरडा काळ असणारा आहे. एक ब्रेक घेऊन दूस-या पर्वासह जेव्हा दिल दोस्तीची लागवड होईल. तेव्हा दिल दोस्ती लोकांना पून्हा आवडेल. आणि सुगीचाच काळ असेल.”
पुष्कराज चिरपुटकर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतो, “मला अभिनेता म्हणून ह्या भूमिकेने लोकांसमोर एस्टॅब्लिश केलं. मला ओळख दिली. मित्र दिले. त्यामूळे अर्थातच आता इथून पूढे आम्ही काय काम करतोय. आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करतोय का, हे महत्वाचं आहे.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, celebrity kids सखी गोखले आणि स्वानंदी टिकेकर ह्यांचं मालिकेमुळे बदलेलं आय़ुष्य
(फोटो- स्वप्निल चव्हाण)