आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yesteryear\'s Hot And Sensuous Actress Shilpa Shirodkar Says No To Marathi Films

Yesteryear’s Hot Actress शिल्पा म्हणतेय, मराठी फिल्म नको रे बाबा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्वदीच्या दशकात कमी कपड्यात आपला कमानीय बांधा दाखवत आपल्या मधाळ आवाजाची नशा आणि आपल्या अदांनी तरूणांना वेड लावणारी मराठी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आजकाल सिल्व्हर स्क्रिनपासून दूर राहून छोट्या पडद्यावर आईच्या भूमिका करतेय. खरं तर, शिल्पाने भारतात परत आल्यावर दोन वर्षांपूर्वी एका मराठी चित्रपटाची निर्मितीही केली. २०१४मध्ये तिची निर्मिती असलेला सौं. शशी देवधर हा चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर आता ही ग्लॅमरस शिल्पा मराठी सिनेमात अभिनेत्री म्हणून कधी येणार, ह्याकडे तिच्या चाहत्यांचे डोळे लागले असतानाच ती हिंदीत आईच्या भुमिका करू लागली.
त्यामुळे अर्थातच तिला भेटल्यावर पहिला प्रश्न पडला की, अरे शाहरूख खान, अक्षयकुमार, अजय देवगन सारखे हिरो आणि आता तर प्रियंका चोप्रासारखी आघाडीची अभिनेत्रीही मराठी सिनेमा निर्मितीमध्ये पाऊल ठेवत असताना, तू कुठे गायब झालीस? ह्या प्रश्नावर शिल्पा म्हणते, “माझी पहिली मराठी फिल्म निर्मिती फ्लॉप झाली. त्यामूळे मी सध्या मराठी सिनेमाबाबत कान पकडलेत.”
कोणताही निर्माता जिथे आजकाल आपल्या सिनेमाच्या नफ्याचे आकडे फुगवून सांगतो. तिथे शिल्पासारखी आपल्याच सिनेमाला मिडीयासमोर ‘फ्लॉप’ असं मान्य करणारी एखादीच स्पष्टवक्ती अभिनेत्री-निर्माती असते. ह्यावर शिल्पा स्पष्टीकरण देताना म्हणते, “ हे पाहा, माझ्सारख्या नवोदित निर्मात्यासाठी माझी पहिली फिल्म फ्लॉप होणे, ही गोष्ट मोठी होती. त्यामुळे सध्या काही काळ निर्मितीक्षेत्रापासून विश्रांती घेऊन अभिनयात जम बसवायचा निर्णय घेतलाय. ‘सौ.शशी देवधर’मूळे मला एक धडा मिळाला की, जरी तुम्ही ह्या फिल्मइंडस्ट्रीचे असाल, काही वर्ष काम करून तुम्ही ओळख निर्माण केलेली असेल, तरीही तुमच्या मदतीला कोणीही धावून येत नाही. ती फिल्म चांगली चालली असती तर कदाचित मी मराठीत किंवा निर्मिती क्षेत्रात काही केलं असतं. पण दूर्देवाने चांगले सिनेमे चालतीलच असं काही नाही.”
शिल्पा पूढे म्हणते, “आणि अक्षय, अजयसारख्यांबद्दल म्हणशील तर, त्यांच्यात आणि माझ्यात सध्या जमीन-आसमानाचा फरक आहे. अक्षयकुमार, अजय देवगण हे सध्याचे मोठे स्टार आहेत त्यांच्या फिल्म बॉलीवूडमध्ये चालतात. त्यामुळे मराठीतही त्यांना चांगला पाठिंबा मिळतो. माझं मात्र अगदी उलट होतं. मी १३ वर्षांच्या विश्रांतीनंतर अगदी एखाद्या नवोदितासारखी परतले. त्यामुळे श्रीगणेशापासून सुरूवात होती. एक बरं झालं की, लोकं कळली. आता पहिल्यांदा स्वत:ला सिध्द करणार मग निर्मितीसंस्थेला.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शिल्पा शिरोडकरचे ग्लॅमरस फोटो