आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेंदी सेरेमनीत असा होता ‘चक दे गर्ल’ अंदाज, बघा Inside Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘चक दे गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान अलीकडेच विवाहबंधनात अडकले आहेत. 23 नोव्हेंबर रोजी दोघांनी कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर त्यांनी मित्रांसाठी कॉकटेल पार्टीचे आयोजन केले होते. रविवारी सागरिकाची मेंदी सेरेमनी पार पडली. या कार्यक्रमालासुद्धा क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. सागरिकाच्या मेंदी सेरेमनीतील इनसाइड फोटोज तिच्या फ्रेंड्सनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या कार्यक्रमासाठी सागरिकाने ब्लू कलरच्या लेहेंगा तर झहीरने ब्लू कलरच्या कुर्त्याची निवड केली. त्यापूर्वी झालेल्या कॉकटेल पार्टीत सागरिकाने चंदेरी आणि पांढऱ्या रंगाची सुरेख सांगड घालण्यात आलेला एक लेहंगा घातला होता. तर झहीरने तिच्या लेहंग्याला शोभेल असा राखाडी रंगाचा सूट घातला होता.


पाहुयात, सागरिकाच्या मेंदी सेरेमनीचे Inside Photos...  

बातम्या आणखी आहेत...