आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झहीरने \'त्या\' एका खुबीने केले सागरिकाच्या कुटुंबियांना खुश, अशी मिळवली लग्नाची परवानगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चक दे इंडिया' या सुपरहिट चित्रपटातून लाईमलाईटला आलेली अभिनेत्री सागरिका घाटगेने क्रिकेटर झहीर खानसोबत संसार थाटला आहे. दोघांनी गुरुवारी कोर्ट मॅरेज केले. यावेळी त्यांच्या काही मित्र-मैत्रिणींनी ही न्यूज जगजाहीर केली. यानंतर गुरुवारी रात्रीच मुंबईच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एक कॉकटेल पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीत झहीर-सागरीकाच्या जवळच्या लोकांना बोलवण्यात आले होते. 

 

पण अभिनेत्री सागरीका आणि क्रिकेटर झहीर यांचे जुळले तरी नेमके कसे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. स्वतः सागरीका आणि झहीरलाही त्यांचे कधी प्रेम जुळेल असे वाटले नव्हते पण हे दोघे प्रेमात पडले आणि त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. त्यानंतर मोठा प्रश्न होता ते घरच्यांना मनवण्याचा. सागरीकाच्या घरच्यांना कसे पटवले याची रंजक कथा झहीरने सांगितली. 

 

 या एका गुणवैशिष्ट्यामुळे मिळाली घाटगे कुटुंबियात एन्ट्री..
काही दिवसांपूर्वी मीडियाशी केलेल्या बातचीतदरम्यान सागरिकाने खुलासा केला की झहीरने कशाप्रकारे तिच्या आईवडिलांना पटवले. सागरिकाने सांगितले तिचे कुटुंबीय केवळ क्रिकेटच नाही तर प्रत्येक खेळाडूचे फॅन आहेत. याशिवाय झहीर खान उत्तम प्रकारे मराठीही बोलतो त्यामुळे त्याच्यासाठी तिच्या घरच्यांना मनवणे सोपे झाले. 

 

सागरिका कोल्हापूरच्या राजघराण्यातील आहे. सागरिकाच्या घरी सर्वजण मराठीत बोलतात. क्रिकेट आणि मराठी या दोन गुणांमुळे झहीरला सागरिकाच्या घरात एंट्री मिळाली आणि त्यांना लग्नाची परवानगीही मिळाली. 

 

पहिल्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे रोमान्स...
सागरिका घाटगे आणि झहीर खान यांनी 25 मे 2017 रोजी साखरपुडा केला होता. दोघांची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी कथेप्रमाणेच आहे. सागरिकाची लव्ह स्टोरी तिच्या पहिल्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे. चक दे मध्ये सागरिकाने एका क्रिकेटपटुला डेट केले होते तर खऱ्या आयुष्यातही क्रिकेटपटुला डेट केल्यानंतर सागरिका आता विवाहबंधनात अडकली आहे. 

 

युवराज आणि हेजलच्या लग्नात वेधले होते सर्वांचे लक्ष
सागरिका आणि झहीर खान यांच्या अफेअरबद्दल फारसे कुणाला माहीत नव्हते. पण क्रिकेटर युवराज सिंगच्या लग्नात त्यांच्या अफेअरविषयी जास्त चर्चा झाली. सोबत त्यांनी मीडियाला काही पोजही दिले. यानंतर दोघे नेहमी सोबत दिसू लागले. इंस्टाग्रामवर सागरिका-झहीर नेहमी फोटो शेअर करतात. 

 

सोमवारी होणार रिसेप्शन...
सागरिका आणि झहीर यांची मेहंदी सेरेमनी रविवारी 26 नोव्हेंबर आणि रिसेप्शन 27 नोव्हेंबरला होणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, झहीर खान आणि सागिरका घाटगे यांचे काही खास PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...