आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी सेलिब्रिटींच्या मांदियाळीत रंगली झी चित्रगौरव 2017ची नॉमिनेशन पार्टी, बघा खास क्षणचित्रे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 2017 साठी झी चित्रगौरव, झी नाट्यगौरव (प्रायोगिक), झी व्यावसायिक नाट्यगौरव या गटातील पुरस्कारांकरीता गुरुवारी मुंबईत जंगी नॉमिनेशन पार्टी आयोजित करण्यात आली होती.  या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर या अभिनेत्याने केले. झी चित्रगौरव पुरस्कार 2017साठी उत्कृष्ट चित्रपट या विभागात 'सैराट' या चित्रपटाला तब्बल दहा नॉमिनेशन मिळाले. याशिवाय कासव, व्हेंटिलेटर, टेक केअर गुडनाईट, उबंटु या चित्रपटांना नामांकने जाहीर झाली आहेत. तर उत्कृष्ट अभिनेता या गटात मकरंद अनासपुरे (चित्रपट - रंगा पतंगा), आकाश ठोसर (सैराट), गिरीश कुलकर्णी (जाऊं द्या ना बाळासाहेब) व उत्कृष्ट अभिनेत्री गटात इरावती हर्षे (कासव), पर्ण पेठे (फोटोकॉपी), रिंकु राजगुरु (सैराट) यांना नामांकने प्राप्त झाली आहे.

या नॉमिनेशन पार्टीत मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींची मांदियाळी जमली होती. जयवंत वाडकर, उषा नाडकर्णी, संकर्षण क-हाडे, सुनील बर्वे, प्रशांत दामले, रमेश भाटकर, स्वानंदी बेर्डे, प्रिया बेर्डे, भारत गणेशपुरे, क्षिती जोग, पूजा सावंत, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, ललित प्रभाकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते. (वाचा, झी चित्रगौरव 2017 या सोहळ्याची संपूर्ण नॉमिनेशन लिस्ट...) 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, झी चित्रगौरव 2017च्या नॉमिनेशन पार्टीचे खास Photos.. 
बातम्या आणखी आहेत...