आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झी चित्रगौरव 2017 : \'सैराट\'ला 10 नामांकने, नाटक विभागात \'अमर फोटो स्टुडिओ\'ला 12 नामांकने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2017 साठी झी चित्रगौरव, झी नाट्यगौरव (प्रायोगिक), झी व्यावसायिक नाट्यगौरव या गटातील पुरस्कारांकरीता गुरुवारी मुंबईत एका भव्य समारंभात नामांकने जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर या अभिनेत्याने केले. झी चित्रगौरव पुरस्कार 2017साठी उत्कृष्ट चित्रपट या विभागात सैराट, कासव, व्हेंटिलेटर, टेक केअर गुडनाईट, उबंटु या पाच चित्रपटांना नामांकने जाहीर झाली आहेत. तर उत्कृष्ट अभिनेता या गटात मकरंद अनासपुरे (चित्रपट - रंगा पतंगा), आकाश ठोसर (सैराट), गिरीश कुलकर्णी (जाऊं द्या ना बाळासाहेब) व उत्कृष्ट अभिनेत्री गटात इरावती हर्षे (कासव), पर्ण पेठे (फोटोकॉपी), रिंकु राजगुरु (सैराट) यांना नामांकने प्राप्त झाली आहे.
 
झी चित्रगौरव पुरस्कार 2017ची गटवार नामांकने

उत्कृष्ट  वेशभूषा - (1) सचिन लोवळेकर - हाफ तिकीट, (2) रश्मी रोडे - रंगा पतंगा, (3) अपर्णा गुराम - एक अलबेला
 
उत्कृष्ट रंगभूषा - (1) विद्याधर भाटे - एक अलबेला, (2)  संतोष गायके - हाफ तिकीट, (3) श्रीकांत देसाई - रंगा पतंगा
 
उत्कृष्ट कलादिग्दर्शन - (1) वासू पाटील - हाफ तिकीट, (2) संतोष फुटाणे - उबंटु, (3) बबन अडांगळे - एक अलबेला
 
उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - (1) सूजीतकुमार - उबंटु उबंटु - उबंटु  (2) राहूल- संजीव - ओ काका - वाय झेड, (3) उमेश जाधव - फिल्मी फिल्मी हुआ - गुरु
 
उत्कृष्ट दिग्दर्शक - (1) सुमित्रा भावे- सुनील सुकथनकर - कासव, (2) नागराज मंजुळे - सैराट (3) राजेश मापुसकर - व्हेंटिलेटर
 
उत्कृष्ट संकलन (1) मोहित टाकळकर - कासव (2) रामेश्वर भगत - व्हेंटिलेटर (3) फैजल - इम्रान - हाफ तिकीट
 
उत्कृष्ट छायाचित्रण - (1) संजय मेमाणे - हाफ तिकीट (2) धनंजय कुलकर्णी - कासव, (3) संजय मेमाणे - नदी वाहते
 
उत्कृष्ट ध्वनिरेखाटन - (1) अविनाश सोनावणे - सैराट (2) अनमोल भावे - उबंटु (3) सुहास राणे - उबंटु
 
उत्कृष्ट पार्श्वसंगीत - (1) अजय- अतुल - सैराट (2) संकेत कानेटकर- कासव, (3) नरेंद्र भिडे - उबंटु
 
उत्कृष्ट गीतकार - (1) समीर सामंत - माणसाने माणसाशी - उबंटु (2) इलाही जमादार - ऐ सनम - रंगा पतंगा (3) अजय गोगावले - झिंगाट - सैराट
 
उत्कृष्ट पार्श्वगायिका - (1) सायनी रविंद्र - मगन मगन मस्त मलंगा - वन वे तिकीट, (2) श्रेया घोषाल - आताच बया का बावरलं - सैराट (3) नेहा राजपाल - ओली ती माती - फोटोकॉपी
 
उत्कृष्ट पार्श्वगायक - (1) आदर्श शिंदे - ऐ सनम - रंगा पतंगा (2) अजय गोगावले - याड लागलं - सैराट, (3) गौरव ढगावकर - मगन मन मस्त मलंगा - वन वे तिकीट
 
उत्कृष्ट संगीत - (1) अजय- अतुल - सैराट, (2) गौरव ढगावकर - वन वे तिकीट, (3) कौशल इनामदार - रंगा पतंगा
 
उत्कृष्ट  कथा - (1) राजन खान - हलाल, (2) गिरीश जोशी - टेक केअर गुडनाईट, (3) अंबर हडप, गणेश पंडित, जतीन वागळे- बंध नायलाँनचे
 
उत्कृष्ट पटकथा - (1) सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर - कासव, (2) गिरीश जोशी - टेक केअर गुडनाईट, (3) राजेश मापुसकर - व्हेंटिलेटर
 
उत्कृष्ट संवाद - (1) सुमित्रा भावे- सुनाल सुकथनकर - कासव, (2) नागराज मंजुळे - भारत मंजुळे - सैराट, (3) गिरीश कुलकर्णी - जाऊंद्याना बाळासाहेब
 
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - (1) स्मिता तांबे - गणवेश, (2) प्रियांका कामत बोस - हाफ तिकीट, (3)  पूनम शेडगावकर - नदी वाहते
 
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - (1) प्रियदर्शन जाधव - हलाल, (2) सारंग साठे - उबंटु, (3) संदीप पाठक - रंगा पतंगा
 
उत्कृष्ट बालकलाकार - (1) आर्य आढाव - दशक्रिया, (2) शुभम मोरे, विनायक पोतदार - हाफ तिकीट, (3) भाग्यश्री शंखपाल - उबंटु
 
पुढे वाचा, झी नाट्यगौरव पुरस्कार 2017ची व्यावसायिक नाटक विभागातील नामांकने... 
बातम्या आणखी आहेत...