आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Celebs Soptted At Zee Gaurav 2015 Nomination Party

मराठी सेलिब्रिटींच्या मांदियाळीत रंगली झी गौरव 2015ची नॉमिनेशन पार्टी, पाहा खास PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(झी गौरव 2015ची नॉमिनेशन पार्टीत जमलेली सेलिब्रिटींची मांदियाळी)
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अतिशय मानाचा समजल्या जाणा-या झी गौरव पुरस्कार सोहळ्याची यंदाची नामांकने एका रंगतदार कार्यक्रमात जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये यावर्षी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि समीक्षकांनी गौरविलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ने 13 नामांकने मिळवत आघाडी घेतली आहे तर यंदा ब्लॉकबस्टर हिट ठरलेल्या ‘लय भारी’ने तब्बल 12 विभागात नामांकने मिळवली. याशिवाय ‘लोकमान्य-एक युगपुरूष’,‘पोश्टर बॉईज’आणि ‘क्लासमेट्स’नेही महत्त्वाच्या विभागांमध्ये नामांकने मिळवत स्पर्धेत रंगत आणली आहे.
नामांकने जाहिर झाल्यानंतर मराठी सेलिब्रिटींसाठी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत मराठीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. प्रिया बापट, उमेश कामत, वैभव मांगले, सुशांत शेलार, श्रीरंग गोडबोले, सई ताम्हणकर, रवी जाधव, संजय जाधव यांच्यासह झी मराठी वाहिनीवरील कलाकार उपस्थित होते.
या पार्टीत क्लिक झालेली सेलिब्रिटींची खास झलक बघा पुढील स्लाईड्समध्ये...