आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झी मराठी अवॉर्ड: \'जुळून येती रेशीम\'गाठीची बाजी, \'जान्हवी-श्री\' सर्वोत्कृष्ट जोडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डावीकडून, तेजश्री आणि शशांक केतकर, सई ताम्हणकर आणि ललित बदाने, स्वप्नील जोशी आणि तेजश्री प्रधान)

झी मराठी वाहिनीवरील कुठली सून ठरणार सर्वोत्कृष्ट सून आणि कुठली सासू असेल प्रेक्षकांची आवडती? कोण असेल रसिकांची लाडकी आई आणि कुठल्या 'बाबां'वर रसिक उमटवणार पसंतीची मोहोर? याबाबत रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचलीय. हीच उत्सुकता आता ताणून न धरता आम्ही तुम्हाला 'झी मराठी अवॉर्ड 2014' मध्ये कोणत्या व्यक्तिरेखेने बाजी मारली ते सांगत आहोत.
यंदाचा 'वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2014' सोहळा अर्थात 'उत्सव नात्यांचा, आपल्या माणसांचा' मोठ्या दिमाखात साजरा झाला. यंदाच्या अवॉर्ड सोहळ्यात 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेने बाजी मारली असून तब्बल सात पुरस्कार आपल्या नावी केले आहेत, तर 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेने सहा पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील जान्हवी-श्री ही सर्वात्कृष्ट जोडी ठरली असून सर्वोत्कृष्ट मालिकेचा मानही या मालिकेने पटकावला आहे. तर 'जुळून येती रेशीमगाठी'मधील आदित्य सर्वोत्कृष्ट नायक आणि 'होणार सून...' मालिकेतील जान्हवी सर्वोत्कृष्ट नायिका ठरली आहे.
मराठी कलावंतांच्या मांदियाळीला गौरवणारा 'झी मराठी अवॉर्ड सोहळा 2014 उत्सव नव्या नात्यांचा आपल्या माणसां'चा साजरा करायला रसिकांचा महत्त्वाचा सहभाग असतो. सर्वोत्कृष्ट मालिका, कथाबाह्य कार्यक्रम, नायक, नायिका, सूत्रधार, परीक्षक, कुटुंब अशा विविध 21 विभागांमध्ये महाराष्ट्रभरातील 14 शहरांमधील सुमारे 70 केंद्रांवर साधरणातः 70 हजार प्रेक्षकांनी यावेळी आपली निवड नोंदवली.
या अवॉर्ड सोहळ्यात झी मराठीबरोबरच मराठी कलाक्षेत्रातील कलावंत, कलाप्रेमी आणि रसिक खास उपस्थित होते. येत्या 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता हा अवॉर्ड सोहळा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
झी मराठी अवॉर्ड 2014 सोहळ्याचे विजेते पुढीलप्रमाणे...
सर्वोत्कृष्ट मालिकाः होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट कुटुंबः देसाई कुटुंब - जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट नायकः आदित्य - जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट नायिकाः जान्हवी - होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्रीः अस्मिता
सर्वोत्कृष्ट भावंडं : आदित्य-अमित-अर्चना - जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट जोडीः श्री-जान्हवी - होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट आईः माई देसाई - जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट वडीलः नाना देसाई - जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट सासूः माई देसाई - जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट सूनः जान्हवी - होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट सहायक व्यक्तिरेखा स्त्रीः महालक्ष्मी - जय मल्हार
सर्वोत्कृष्ट सहायक व्यक्तिरेखा पुरुषः लक्ष्मीकांत गोखले - होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखाः सुरेश कुडाळकर - जुळून येती रेशीमगाठी
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीतः जय मल्हार
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालकः निलेश साबळे - चला हवा येउ द्या
सर्वोत्कृष्ट परीक्षक कथाबाह्य कार्यक्रमः अवधुत गुप्ते - सारेगमप
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमः होम मिनिस्टर
विशेष लक्षवेधी चेहराः अदिती खानोलकर - का रे दुरावा
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या पुरस्कार सोहळ्याची खास छायाचित्रे...