एंटरटेन्मेंट डेस्कः शुक्रवारी (6 ऑक्टोबर) मुंबईत झी मराठी अवॉर्ड्स 2017 चा दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिकेतील जोड्यांनी दमदार परफॉर्मन्स देऊन सोहळ्याला चारचाँद लावले. 'लागिर झालं जी' मालिकेतील शीतल-अजिंक्य, 'तुझ्यात जीव रंगला'मधील राणा-अंजली, 'माझ्या नव-याची' बायको या मालिकेतील गुरु-राधिका- शनाया, 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेतील मीरा-समीर या जोड्यांनी रोमँटिक गाण्यांवर बहारदार नृत्य सादर केले. तर डॉ. निलेश साबळेने या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. यावर्षी कोणकोणत्या कलाकारांनी बाजी मारत झी मराठी अवॉर्ड आपल्या नावी केला, हे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
सेलिब्रेट झाला 'राणा'चा बर्थडे..
विशेष म्हणजे या सोहळ्यात प्रेक्षकांचा लाडका राणा अर्थातच अभिनेता हार्दिक जोशीचा वाढदिवसही साजरा झाला. 6 ऑक्टोबर रोजी हार्दिकचा वाढदिवस असतो. यावेळी तुझ्यात जीव रंगलाची टीम आणि आईवडिलांसोबत हार्दिकने मंचावर केक कापला.
या दिमाखदार सोहळ्याची खास छायाचित्रे झी मराठीच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आली आहेत. पाहुयात, कसा रंगला हा सोहळा...