दोन वर्षापूर्वी ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिका ‘झी मराठी’वर सुरू झाली. पाहता पाहता, आदित्य-मेघना आणि देसाई कुटूंबातली सगळी मंडळी प्रेक्षकांच्या चांगल्याच परिचयाची झाली. प्रेक्षकांच्या प्रेमासोबतच टीआरपीमध्ये बरेच चढ-उतार ह्या मालिकेने पाहिले. आणि त्यानंतर आता मालिका तिच्या अंतिम टप्प्यात आलीय. २६ सप्टेंबरला ह्या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.
‘झी मराठी’वर सध्या वैभव मांगलेचा स्त्री वेशातला प्रोमो दाखवला जातोय. वैभवची ही ‘पती माझे सौभाग्यवती’ मालिका ‘झी’वर ‘जुळून येती’च्या जागी सुरू होणार आहे.
‘जुळून येती रेशीमगाठी’ची मेघना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्त माळीशी मालिकेची आता सांगता होतेय, ह्या संदर्भात संवाद साधल्यावर ती म्हणाली,”आमची मालिका एक ‘आयडियल फॅमिली’ म्हणून प्रसिध्द आहेच. मध्यंतरीच्या काळातले रूसवे-फुगवे आता मिटलेत. त्यामुळे आता शेवट गोड होताना दिसेल. ह्या मालिकेने मला भरभरून दिलंय. ‘मेघना’ अशी लोकांनी हाक मारणं आता सवयीचं झालं होतं. पण माझी पूर्ण खात्री आहे,मालिका संपली तरीही, ह्या मेघनाला लोकं इतक्या सहजी विसरू शकणार नाहीत.”
“ह्या मालिकेने मला महाराष्ट्राच्या कानाकोप-यात ओळख दिली. ही सासू-सूनेची कारस्थान आणि हेवेदावे असणारी मालिका नाही. आणि अशा मालिकेत माझी महत्वाची भूमिका होती, ह्याचं मला समाधान आहे. मालिका संपल्याचं वाईट निश्चितच वाटतंय. पण कलाकाराने आपल्या भूमिकेपासून थोडं डिटॅच होणं गरजेचं आहे. त्यामूळे मी मेघनात गुंतलेले नाही. मेघनाची भूमिका आता संपतेय. आणि आता ते मी एक्सेप्ट केलंय.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, आदित्य सांगतोयस मालिकेविषयी