आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पडद्यावर निर्मिती सावंत-किशोरी शहाणेचं कमबॅक, ही आहे ‘जाडूबाई जोरात’ची स्टोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
वजन हा आपल्या शरीराचा भाग असतो परंतू वजन म्हणजेच पूर्ण शरीर नसतं किंवा ती आपली ओळखही नसते. असं असलं तरी आपल्याकडे एखाद्याची शारिरीक व्याधी, व्यंग किंवा वेगळेपणा हा त्याची ओळख बनतो. म्हणजे कुणाची उंची कमी असेल तर त्याला बुटका, ठेंगणा म्हणणं, कुणाचं वजन जास्त असलं तर जाड्या म्हणणं असे प्रकार आपण करतो. यामध्ये अनेकदा समोरच्याची मस्करी करण्याचा प्रयत्न असतो तर कधी कमी लेखण्याचा... पण यामुळे त्या व्यक्तिच्या भावनाही दुखत असतील याचा विचार फार कमी जण करतात. अशाच कमी लेखण्यातून काय घडू शकतं? याची गंमतीदार गोष्ट बघायला मिळणार आहे ‘जाडूबाई जोरात’ या झी मराठीच्या नव्या मालिकेमधून.
 
येत्या 24 जुलैपासून सोमवार ते शनिवार दुपारी 1 वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सायंकाळच्या प्राईम टाईममध्ये मालिकांच्या मनोरंजनानंतर आता दुपारच्या नव्या वेळेतही झी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी ही खास मालिका घेऊन येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत.

पुढे वाचा, काय आहे ‘जाडूबाई जोरात’ची स्टोरी...