आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'संभाजी\' मालिका येतेय, हा अभिनेता साकारतोय संभाजी महाराजांची भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेक्षकांना लवकरच एका महापुरुषाची गाथा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुत्र संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा लवकरच 'संभाजी' या मालिकेतून आपल्याला बघायला मिळणार आहे. झी मराठी वाहिनीवर ही मालिका सुरु होत आहे. आजवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमांतून पाहिला. पण, टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा दाखविली जाणार आहे. 

डॉ. अमोल कोल्हे साकारतोय संभाजी... 
यापूर्वी मालिका आणि नाटकांमध्ये छत्रपती शिवाजी राजांच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता डॉ. अमोल कोल्हे हा संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. अलीकडेच मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत ‘संभाजी’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हेचा लूक सादर करण्यात आला. संभाजी महाराजांची ओळख महाराष्ट्रातील तरूण जनतेला व्हावी यासाठी या मालिकेची निर्मिती करण्यात आल्याचे डॉ. अमोल कोल्हेने पत्रकार परिषदेत सांगितले. या मालिकेत जिजामाता यांची भूमिका अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर तर शंभूराजांच्या आईची म्हणजेच सईबाईंची भूमिका पूर्वा गोखले साकारणार आहे. 

येत्या 25 सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर दाखल होतेय मालिका... 
संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या मालिकेचा विशेष दोन तासांचा भाग 24 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर 25 सप्टेंबरपासून रात्री 9 वाजता या मालिकेचे प्रसारण सुरु होईल.
 
पाहुयात, संभाजी महाराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे यांचा लूक आणि शेवटच्या स्लाईडवर मालिकेचा पहिला प्रोमो... 
बातम्या आणखी आहेत...