Home »Bollywood »Marathi Cinekatta» Zee Marathi Serial Kahe Diya Pardes Will Go Off Air

गौरी-शिव घेणार प्रेक्षकांचा निरोप, वाचा कसा असेल 'काहे दिया परदेस' मालिकेचा शेवट

दिव्य मराठी वेब टीम | Sep 12, 2017, 12:11 PM IST


मुंबईची मुलगी गौरी आणि 'गंगा किनारे वाला' शिव यांची प्रेमकथा असलेली 'काहे दिया परदेस' ही झी मराठीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी, 'स्वराज्य रक्षक संभाजी' ही नवीकोरी ऐतिहासिक मालिका रात्री 9 वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे.
28 मार्च 2017 रोजी 'काहे दिया परदेस' ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली होती. भाषा आणि प्रांताच्या बंधनापलीकडे जाऊन प्रेमाचं आपलं एक नवं विश्व तयार करणा-या शिव-गौरीची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.
असा असेल मालिकेचा शेवट...
प्रेमाला कुठल्याच सीमा नसतात, ही थीम घेऊन दोन संस्कृतींचा मिलाफ दाखवण्याचा प्रयत्न झी मराठीने 'काहे दिया परदेस' या मालिकेतून केला होता. कालांतराने त्यात सासू-सून मतभेद, कट-कारस्थानं, गैरसमज, ताणतणाव, धक्के हे सगळं ओघाने आलेच. पण आता सगळी दुरावलेली नाती, झाले गेले गंगेला वाहून पुन्हा जवळ येऊ लागली आहेत. गौरीला जुळी मुलं होणार असल्याची खुशखबरही मिळाल्यानं, मुलगा की मुलगी हा वादही दिग्दर्शकाने खुबीने निकाली काढलाय. मालिकेची वाटचाल गोड शेवटाकडे सुरू आहे. त्यामुळे आता गौरीची डिलिव्हरी झाली की, सावंत आणि शुक्ल परिवार एकत्र येऊन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

Next Article

Recommended