आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'रात्रीस खेळ चाले\' घेणार निरोप, आदिनाथ कोठारे-तेजस्विनी पंडीतची नवी मालिका होणार दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून नाईकांच्या वाड्यातील रहस्यमयी हालचाली आता शांत होणार आहेत. दिवसेंदिवस उत्कंठा वाढवणाऱ्या या वाड्यात घडणाऱ्या घटनांमागचा खरा गुन्हेगार कोण? याचे उत्तर घरातील मंडळी आपापसातच शोधत आहेत. पण त्यांना आणि प्रेक्षकांना हवे असलेले उत्तर दिवाळीपूर्वीच मिळणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका दिवाळीपूर्वीच निरोप घेणार आहे. त्याजागी आदिनाथ कोठारे आणि तेजस्विनी पंडित या जोडीची ‘हंड्रेड डेज’ ही रहस्यमय मालिका दाखल होणार आहे. ‘हंड्रेड डेज’ ही नवी मालिका येत्या 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे समजते. 22 ऑक्टोबरला ‘ रात्रीस खेळ चाले’ चा शेवटचा भाग प्रदर्शित होणार असून नवीन मालिकेचे प्रमोही वाहिनीवरून झळकत आहेत.
मालवणी भाषेचा लेहजा असलेल्या या मालिकेत एकामागोमाग एक घडत जाणाऱ्या रहस्यमय घटनांचा माग घेताना, कोकणातील सगळ्या प्रथा, अंधश्रद्धा यांचा आधार घेत रचलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला सुरुवातीला विरोध झाला होता. या विरोधाला छेद देत या मालिकेने दोनशे भागांचा टप्पा गाठला. कुठलेही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा आज घराघरांत लोकप्रिय झाल्या आहेत.
पुढे वाचा, या मालिकेवर उठली होती टीकेची झोड...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...