आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झी टॉकीजच्या यंदाच्या कॅलेंडरवर अवतरणार सौंदर्य महाराष्ट्राचे, पाहा गेल्यावर्षीची झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(झी टॉकीजने 2015च्या कॅलेंडरवर झळकलेल्या अभिनेत्री पूजा सावंत, संस्कृती बालगुडे आणि अंजली पाटिल)
झी टॉकीज दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कॅलेंडर प्रेक्षकांच्या भेटीला आणत असते. 2013मध्ये झी टॉकीजने चित्रपटांच्या शताब्दीनिमित्त एक आगळीवेगळी भेट सिनेरसिकांनी दिली होती. मराठी चित्रपटांमध्ये मोलाची कामगिरी बजावणा-या दिवंगत कलावंतांना आकर्षक कॅलेंडरच्या रुपातून एक आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली होती. तर 2014मध्ये रिलीज करण्यात आलेले कॅलेंडर चित्रपटसृष्टीशी संबंधित सर्व पडद्यामागील कलावंतांना समर्पित करण्यात आले होते. पडद्यामागील शिल्पकारांना, त्यांच्या मेहनतीला दाद मिळाली ही झी टॉकीजची मनिषा त्यांनी कॅलेंडरच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली होती. आता झी टॉकीजच्या यंदाच्या दिनदर्शिकेचे वेगळेपण काय असणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अद्याप झी टॉकीजने 2015 चे कॅलेंडर लाँच केलेले नाही. मात्र फेसबुक पेजवर यंदाच्या कॅलेंडरची थीम उघड करण्यात आली आहे.
झी टॉकीजच्या यंदाच्या कॅलेंडरवर महाराष्ट्राचे सौंदर्य अवतरणार आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेली आणि विवधरंगी सौंदर्याने नटलेल्या महाराष्ट्र भूमीला अनेकविध कलांच्या आविष्काराचे कोंदण लाभले आहे. याच वैविध्यपूर्ण कलांचा संगम मराठी चित्रपटांमधून वेळोवेळी दिसला. अभूतपूर्ण सौंदर्याने नटलेला हा महाराष्ट्र आणि अजोड सौंदर्याने नटलेली ही मराठी चित्रनगरी... या दोघांची गुंफण घालत झी टॉकीज सौंदर्याचा अनोखा नजराणा सिनेरसिकांसाठी घेऊन येत आहे.
2015च्या कॅलेंडरवर अभिनेत्री संस्कृती बालगुडे, पूजा सावंत आणि अंजली पाटील या अभिनेत्रींच्या निखळ सौंदर्याची झलक बघायला मिळतेय. सौंदर्य आणि कलेची गुंफण घालणा-या या कॅलेंडरवर या तिघींव्यतिरिक्त आणखी कोणकोणते कलाकार झळकले, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही अभिनेत्रींचे हे ग्लॅमरस रुप आपल्या कॅमे-यात टिपले आहे प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला यावर्षी कॅलेंडरवर स्थान प्राप्त करणा-या अभिनेत्रींसोबतच गेल्यावर्षी कॅलेंडरवर हॉट रुपात अवतरल्या मराठी तारकांची झलक दाखवत आहोत. गेल्यावर्षी अभिनेत्री गिरीजा जोशी, तेजस्विनी लोणारी, प्रिया बापट, पूजा सावंत, सोनाली कुलकर्णी श्रिया पिळगावकर, पूर्वा पवार, सई ताम्हणकर, मृण्मयी देशपांडे, शिबानी दांडेकर, नेहा पेंडसे या अभिनेत्रींनी मराठी सिनेसौंदर्याच्या शिल्पकारांना मानाचा मुजरा दिला होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा अभिनेत्रींचे मनमोहून टाकणारे रुप...