आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: 'जमाई राजा'फेम निया शर्माने पोस्ट केला ग्लॅमरस व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 'जमाई राजा' या मालिकेतील अभिनेत्री निया शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ नियाने केलेल्या एका फोटोशूटचा आहे. हा व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. नियाने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एका दिवसातच या व्हिडिओला 3.35 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. निया यामध्ये ग्लॅमरस लूकमध्ये दिसतेय. तिने व्हाइट कलरचा गाऊन घातला आहे. निया टीव्हीच्या प्रसिध्द अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एशियाची तिसरी मोस्ट सेक्सी वुमन असल्याचा किताब तिला मिळाला आहे. नियाने 'काली'(2010-11) या टीव्ही शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिला खरी ओळख ही 'एक हजारों में मेरी बहना है' (2011-13)' आणि 'जमाई राजा (2014-17)'  मधून मिळाली. यासोबतच ती 'खतरो के खिलाडी सीजन 8' मध्ये दिसली आहे. दिल्लीमध्ये जन्मलेल्या नियाने मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्यूएशन केले आहे. तिचे खरे नाव नेहा शर्मा आहे.

बातम्या आणखी आहेत...