Home | Mirch Masala | sanjay dutt alleged affair with close friend kumar gaurav

इतके जवळ होते संजय दत्त-कुमार गौरव, उडाल्या अफेअरच्या चर्चा; लोक म्हणायचे Homosexual

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 15, 2018, 12:39 PM IST

1986 मध्ये हे दोघे एकमेकांच्या इतक्या जवळ आले होते, की दोघांच्या अफेअरच्या चर्चा उडाल्या.

 • sanjay dutt alleged affair with close friend kumar gaurav

  मुंबई - संजय दत्त आणि त्याचा भाऊजी कुमार गौरव यांच्या मैत्रीचे किस्से बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. मात्र, 2009 नंतर कुमार गौरव चित्रपटांपासून दूर झाला. परंतु, संजय दत्त अजुनही अॅक्टिंगमध्ये सक्रीय आहे. या दोघांनी नाम आणि कांटे या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्रित काम केले होते. 1986 मध्ये हे दोघे एकमेकांच्या इतक्या जवळ आले होते, की दोघांच्या अफेअरच्या चर्चा उडाल्या. एवढेच नव्हे, तर या दोघांची दोस्ती प्रत्यक्षात दोस्ताना असल्याची टीका झाली. लोक यांना समलैंगिक म्हणत होते. यानंतर संजय दत्तने एका मुलाखतीमध्ये गौरव आणि आपल्या मैत्रीवर होणाऱ्या चर्चांवर मौन सोडले होते.


  - कुमार गौरव एक अशी व्यक्ती होती जिने संजय दत्तच्या बुडालेल्या अॅक्टिंग करिअरला नवीन भरारी दिली. 'रॉकी' चित्रपट रिलीझ झाल्यानंतर संजय दत्त अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. त्याच्यावर परदेशातील सुधारगृहात उपचार करण्यात आले आणि तो बरा होऊन देशात परतला. संजय दत्त देशात परतला तेव्हाच कुमार गौरवचे वडील राजेंद्र कुमार यांनी दोघांसोबत नाम हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटामुळेच संजयचे करिअर पुन्हा रुळावर आले.
  - याच चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर एका मुलाखतीमध्ये संजय दत्तने आपले मौन सोडले होते. संजय म्हणाला होता, "माझे आणि कुमार गौरवचे नाते सामान्य आहे. ज्यांचे डोके घाण आहे ते घाणेरडेच विचार करतील. जर आपल्याला ही मैत्री होमोसेक्शुअल वाटत असेल तर हे चुकीचे आहे. आमच्यासारखी हेल्थी रिलेशनशिप बॉलिवूडमध्ये क्वचितच पाहायला मिळते."


  यामुळे नाराझ झाला कुमार गौरव...
  - 2008 मध्ये अशीही वेळ आली जेव्हा संजयवर बहिणींसह कुमार गौरव सुद्धा नाराज झाला होता. त्याला मान्यता कारणीभूत ठरली. संजयने अचानक मान्यताशी विवाह केला. ही गोष्ट प्रिया दत्तसह भाऊजी कुमार गौरवला सुद्धा खटकली. मात्र, काही दिवसांनंतर सर्व काही सुरळीत झाले.
  - कुमार गौरवने 1984 मध्ये संजयची बहिण नम्रताशी विवाह केला होता. त्यावेळी संजय दत्तवर अमेरिकेत उपचार सुरू होते. नम्रताने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, "दादांवर उपचार सुरू आहेत आणि आमचे लग्न ठरले आहे. वडिलांनी त्यांना फोन करून याची माहिती दिली. दादा जेव्हा देशात परततील तेव्हा बंटी आणि अंजू यांचा विवाह संपन्न झालेला असेल."

Trending