आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bold Actress Poonam Pandey Nasha Failed On Box Office

चढला नाही पूनमचा \'नशा\'; बोल्ड सिन्सकडेही प्रेक्षकांनी दाखवली पाठ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोल्ड मॉडेल आणि अभ‍िनेत्री पूनम पांडे हिचा पहिला सिनेमा 'नशा' प्रेक्षकांना नशा चढवू शकला नाही. पूनमला आपल्या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. प्रेक्षकांना आकर्षित करण्‍यासाठी पूनम हिने ‍'नशा'मध्ये भरपूर अंगप्रदर्शन केले होते. एवढेच नाही तर 'नशा' हिट झाला, तर ती आपल्या चाहत्यांसाठी अंगावरील सगळे कपडे उतरविण्याचेही म्हणून एका नव्या वादाला तोंड फोडले होते.

पूनमचा 'नशा' शुक्रवारी सिनेमा गृहात झळकला. 'नशा'मध्ये पूनम हिने विवस्त्र सिन्स दिले आहेत. उघडी पाठ दाखवली आहे. परंतु प्रेक्षकांनी पूनमच्या 'नशा'कडे पाठ दाखवून तिला नाराज केले आहे. 'नशा' आणि 'इशक' या चित्रपयांनी प्रत्येकी एक-एक कोटींचीची तर 'बजाते रहो' या चित्रपटाने 1.25 कोटी रूपयांचा गल्ला भरला आहे.

वारंवार अश्लील फोटो आणि आक्षेपार्ह वक्तव्य यांमुळे गाजणारी पूनम पांडे हिने 'नशा' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

अमित सक्सेना दिग्दर्शित 'नशा' सिनेमात पूनम पांडेसोबत शिवम हा नवा कलाकार अहे. 18 वर्षांचा मुलगा आणि 25 वर्षीय तरुणी यांच्यातील शारीरिक संबंधांवर हा सिनेमा आधारलेला आहे. सुरेंदर सुनेजा आणि आदित्य भाटिया यांच्या ईगल होम एंटरटेनमेंट बॅनरखाली हा सिनेमा तयार करण्यात आला आहे.

या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पूनम पांडे जोरदार प्रयत्न करत आहे. या सिनेमाची पोस्टर्सही प्रक्षोभक आहेत. या पोस्टर्सना शिवसेनेने जोरदार विरोध केला होता. मात्र आता सिनेमा हिट झाला, तर पूनम पांडे चाहत्यासाठी नग्न होण्याचेही आश्वासन दिले होते. यापूर्वी भारताने विश्वचषक जिंकल्यावर तसेच आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स जिंकल्यावर पूनमने विवस्त्र होण्याचे वक्तव्य केले होते.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा... बोल्ड पूनम पाडेंला