आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Tammana Bhatiya Reject Kissing Seans And Bikini Seans

PHOTOS: तमन्ना म्हणते... नो किसिंग, नो बिकिनी सीन्स!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बी टाऊन'मध्ये पदार्पण केल्यानंतर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बहुतेक अभिनेत्री अगदी सहज बोल्ड, किसिंग सीन्स देऊन मोकळ्या होऊन जातात. परंतु काही अभ‍िनेत्री अशा असतात की, त्यांना बोल्ड सीन्स देण्यात फारशी रुची नसते.

आता तमन्ना भाटिया हिलाच पाहा ना, 'हिम्मतवाला'मध्ये अजय देवगणसोबत 'ताथय्या ताथय्या...!' करणार्‍या तमन्ना हिने ऑनस्क्रीन किसिंग ‍करण्यास आणि बिकिनी सीन्स देण्यास चक्क नकार दिला आहे.

तमन्ना ही बॉलिवूड दिग्दर्शक साजिद नाडियावालांच्या "हिम्मतवाला"मध्ये झळकणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान तमन्ना हिने सांगितले की, ती कधीच ऑनस्क्रीन किसिंग सीन्स देणार नाही. तसेच भविष्यात कुठल्याही परिस्थितीत बिकिनी परिधान करून प्रेक्षकांसमोर येणार नाही.

प्रेक्षक एन्जॉय करतील, अशाच चित्रपटांमध्ये तिला काम करायचे आहे. तिला आज अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांच्या ऑफर्स आहेत परंतु त्या स्विकारण्‍यापूर्वी तिने चित्रपट निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्या आहेत.

तमन्ना ही सन 2005मध्ये आलेल्या "चांद से रोशन चेहरा"मध्ये पहिल्यांदा झळकली होती.

तमन्नाचा हॉट अंदाज पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....