बॉलिवूड अभिनेता
जॉन अब्राहमसह ब्राझील अभिनेत्री आणि मॉडेल नैथली कौर काम करणार असल्याची बातमी आहे. बातमी अशी आहे, की जॉन अब्राहमच्या प्रॉडक्शन हाउसचा आगामी सिनेमा लवकरच बॉलिवूडमध्ये येणार आहे. सिमेमाचे नाव 'रॉकी हँडसम' असल्याचे सांगितले जात आहे. हा सिनेमा 'द मॅन फ्रॉम नो व्हेअर' या कोरिअम सिनेमाला रिमेक असणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शक निशिकांत कामत आहे असून जॉन अब्राहमसह नैथली कौर सिनेमात झळकणार आहे. सिनेमाचे शुटिंग हैदराबाद येथे सुरू आहे. सिनेमात माझी मुख्य भूमिका असल्याचे नैथलीने सांगितले आहे. सिनेमात प्रेक्षकांना दमदार अॅक्शन बघायला मिळणार आहे.
कोण आहे नैथली?
नैथली ब्राझीलची रहिवासी असून एक अभिनेत्री आहे. तिने 2012मध्ये किंगफिशर कॅलेंडरचे हंट जिंकल्यापासून भारतात प्रसिध्दी मिळवली. त्यानंतर रामगोपाल वर्माच्या 'डिपार्टमेंट' सिनेमामध्ये आयटम नंबर करून तिने बॉलिवूडमध्ये करिअरला सुरूवात केली होती.