आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मादक सिल्क स्मिता अल्पावधीतच बनली होती \'सुपर हॉट स्टार\', पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
80 च्या दशकात दिवंगत अभिनेत्री सिल्क स्मिताचे नाव मादक भूमिकांमुळे प्रसिद्ध होते. अल्पावधीत सिल्क स्मिता ही दक्षिण भारतीय सिनेसृष्टीत खूप हीट झाली होती. सिल्क जेव्हा रुपेरी पडद्यावर झळकायची तेव्हा प्रेक्षकांच्या टाळ्या तर पडयाच्याच शिवाय शिट्याही थांबत नव्हत्या.
सिल्कचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी आंध्रप्रदेशातील राजमुंदरीमधील एल्लुरु येथे झाला होता. सिल्कचे खरे नाव विजयालक्ष्मी होते. सिल्कने तिच्या दहा वर्षांच्या करिअरमध्ये पाचशे पेक्षा अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला होता.

सिल्कच्या जन्मापासून तिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले होते. चौथ्या इयत्तेपासून शिक्षणाला 'रामराम' ठोकलेल्या सिल्कने मेकअप असिस्टंट म्हणून सुरुवातीला काम केले. 1980 साली आलेल्या 'वांडी चक्रम'मध्ये सिल्क पहिल्यांदा झळकली होती. ‍त्यानंतर सिल्कने कधी मागे वळून पाहिले नव्हते. दक्षिण भारतीय सिने‍सृष्टीत सिल्क टॉपची अभिनेत्री बनली होती. मात्र ऐशोआरामाची झिंग चढलेल्या सिल्कला आपल्या खासगी आयुष्यात घटनांनी ग्रासले होते. तिला आपल्या वाईट सवयीवर नियंत्रण राखता आले नव्हते. त्यामुळे सिल्कला दोन सिनेमांत त्याकाळात सुमारे दोन कोटी रुपयांचा तोटाही सहन करावा लागला होता.
23 सप्टेबर 1996 रोजी सिल्कचा मृतदेह चेन्नई येथील तिच्या घरात सिलिंग फॅनला लटकलेला आढळून आला. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिने सिल्क स्मिताच्या जीवनावरील आधारित 'डर्टी पिक्चर'मध्ये तिची भूमिका साकारली होती.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, सिल्क स्मिताच्या हॉट पोझ...