मुंबई: ब्रिटीश अभिनेत्री आणि मॉडेल समीरा मोहम्मद अली बॉलिवूड मेगास्टार
अमिताभ बच्चन यांच्यासह कामन करण्याचे स्वप्न उराशी बाळगत आहे. 'बी पॉझिटीव्ही' या आगामी सिनेमाची अभिनेत्री समीरा सांगते, की तिला
बिग बींसह काम करण्याची तीव्र इच्छा आहे.
समीराच्या सांगण्यानुसार, 'भारतीय अभिनेत्यांमध्ये
अमिताभ बच्चन माझे आवडते अभिनेते आहेत.ते अद्भूत कलाकार आहेत. मी दुबईत त्यांचे सिनेमे पाहून मोठी झाली आहे. त्यांच्यासह काम करणे माझे एक स्वप्न आहे.'
ब्रिटनची 29 वर्षीय ही अभिनेत्री व्यंकटेश कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणा-या 'बी पॉझिटीव्ही' सिनेमाच्या शूटिंग निमित्त गोव्यात आली होती. छोट्या बजेटचा हा सिनेमा इंग्रजी, हिंदी आणि कन्नड भाषेत रिलीज होत आहेत. राज पुरोहित आणि निवेदिता विश्वास या सिनेमातील कलाकार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ब्रिटनची अभिनेत्री समीराचे ग्लॅमरस छायाचित्रे...