आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केटी होम्स मित्रांसोबत सेलिब्रेट करणार 'डायव्होर्स पार्टी'!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजेलिस- हॉलिवूड अभिनेत्री केटी होम्स हिने गेल्या वर्षी अभिनेता टॉम क्रूज याच्याशी काडमोड केली होती. नवर्‍यासोबत विभक्त होऊन केटीने एक वर्ष पूर्ण होत आहे. नवर्‍यापासून स्वातंत्र्य मिळाल्यामुळे केटी जाम खूश आहे. यामुळे केटी लवकरच न्यूयॉर्कमध्ये तिच्या मित्रांना 'डायव्होर्स पार्टी' देणार आहे.

केटीच्या जवळच्या एका मित्राने सांगितले, की केटीच्या पडत्या काळात तिला सहकार्य केलेल्या सगळ्या मित्रांना तिने आमंत्रित केले आहे. त्यांना पार्टी देऊन ती त्यांच्या सहकार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करणार आहे. 34 वर्षीय केटी होम्स आता दुसर्‍यांदा घरोबा करण्याच्या विचारात नसून, तिची मुलगी सुरीवरच ती आगामी काळात लक्ष केंद्रीत करणार आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा.. केटी होम्सच्या दिलखेचक अदा...