Home »Bollywood »Marathi Cinekatta» Nach Baliye 8 Actor Was Made Fun For His Dark Skin And Teeth Gaps

सावळा वर्ण आहे म्हणून उडवली जात होती खिल्ली, 5 वर्षानंतर मिळाले प्रपोजलचे उत्तर

दिव्य मराठी वेब टिम | Apr 18, 2017, 12:05 PM IST

  • पत्नी तृप्तीसह सिद्धार्थ जाधव
मुंबई- लोकप्रिय मराठी अभिनेता आणि विनोदाचा सुपरस्टार सिद्धार्थ जाधव डान्स रियालिटी शो 'नच बलिये-8' मध्ये सहभागी झाला आहे. वारंवार आपल्या लूक्समुळे रिजेक्ट होत असलेल्या सिध्दार्थने या रियालिटी शोची संधी मिळेल असा विचारही केला नव्हता. सिध्दार्थने अॅक्टिंग करिअरच्या सुरूवातीला सावळ्या वर्णावरून खूप अपमान सहन केला आहे. याचा परिणाम त्याच्या जीवनावर झाला. आमच्या प्रतिनिधीने त्याच्याशी केलेल्या चर्चेत सिद्धार्शने याबाबत माहिती दिली.
5 वर्षानंतर मिळाला होकार..
- सिद्धार्थच्या पत्नीचे नाव तृप्ती असून ती पत्रकार आहे. एका नाटकाच्या ऑडिशनदरम्यान सिद्धार्थ आणि तिची भेट झाली होती.
- काही दिवसानंतर सिद्धार्थने तृप्तीला रेल्वे प्लेटफॉर्मवर लग्नासाठी प्रपोज केले. पण
सिद्धार्थच्या प्रपोजलचे उत्तर तृप्तीने 5 वर्षानंतर दिले.
स्पॉटबॉय बनवून उडवली खिल्ली..
- सिद्धार्थचा जन्म आणि बालपण करवाली (महाराष्ट्र) येथील. चित्रपट सृष्टीत पदार्पणाआधी लुक्समुळे बऱ्याचदा त्याला रिजेक्ट करण्यात आले.
- सावळा वर्ण आणि दात यामुळे त्याची खिल्ली उडवली जायची.
- सिद्धार्थने सांगितले, 1999 मध्ये प्रथमच तो एका हिंदी मालिकेच्या ऑडीशनला गेला होता. त्याठिकाणी त्याला स्पॉटबॉयसारखी वागणूक मिळाली. एका जागी बसवून ठेवले, कामे सांगितली.
पुढील स्लाईडवर वाचा, आई वडिलांना दोष द्यायचा सिद्धू...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended