ग्राफिक्स: नर्गिस फाखरी
अलीकडेच, नर्गिस फाखरी आणि उदय चोप्रा यांच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या होत्या, मात्र करिअरवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगून नर्गिसने या बातम्यांवर पूर्णविराम लावला. त्यामुळे ती आता तिच्या करिअरवर फोकस करत असल्याचे दिसून येत आहे. तिने नुकतेच 'फिल्मफेअर' मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशुट केले आहे. त्यामध्ये ती स्विमसुटमध्ये दिसून येत आहे. नर्गिसच्या या स्विमसुटचा फोटो हा फिल्मफेअरच्या जुलै अंकात दिसणार आहे.
नर्गिसचा हा हॉट अंदाज पाहून तुम्ही पुन्हा या 'रॉकस्टार गर्ल'च्या प्रेमात पडाल...नर्गिसने सलमानच्या 'किक'मध्ये आयटम नंबर करण्यासाठीसुध्दा होकार दिला. ती या आयटम नंबरमध्ये कोणत्या आणि कशा लूकमध्ये दिसणार याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे...मात्र तोपर्यंत पाहा फिल्मफेअर मासिकाच्या कव्हरवर नर्गिसने दाखवलेल्या हॉट अदा...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा नर्गिसचा हॉट अवतार...