बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने 2015ची सुरुवात खूपच ग्लॅमरस पध्दतीने केली आहे. पांढ-या रंगाच एलिगेंट Gucci ड्रेसमध्ये नर्गिस एखाद्या परीपेक्षा कमी दिसत नव्हती. तिने हे फोटोशूट Noblesse मासिकासाठी केले आहे. जानेवारी महिन्याचा हा अंक नर्गिससाठी खूपच खास आहे. कारण वर्षाची सुरुवात तिने धमाकेदार पध्दतीने केली आहे. नर्गिसच्या या फस्ट कव्हरला रोहन श्रेष्ठीने शूट केले आहे. हेअरस्टाइल आणि मेकअपसाठी मारियानाला श्रेय दिले जाते. या फोटोशूटमध्ये नर्गिसने पांढ-या रंगाचा वेस्टर्स आऊटफिट परिधान केला आहे. डोक्यावरील हॅट आणि अंगावरील ज्वेलरीने तिचे सौंदर्य अधिकच खुलले.
काही दिवसांपूर्वी, नर्गिसच्या हॉलिवूड डेब्यू 'Spy' सिनेमाचा ट्रेलरसुध्दा रिलीज झाला आहे. या अमेरिकन अॅक्शन-कॉमेडी सिनेमाला Paul Feigने दिग्दर्शित केले आहे. नर्गिसने 'Saahasam'या तामिळ सिनेमातील एका गाण्यात स्पेशल अॅपेरियन्ससुध्दा दिला आहे. या अमेरिकन आणि हिंदी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्रीचा जादू चाहत्यांवर चाललेली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नर्गिसने 2015साठी केलेल्या फोटोशूटमधील ग्लॅमरस अदा...