आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FABULOUS AT 44: बघा जेनिफरचा जलवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन दशकांपासून ग्लॅमर जगतात राज्य करणारी प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर एनिस्टन वयाच्या 44व्या वर्षीसुद्धा खूप स्टायलिश आहे. आपल्या चेह-यावरील यूथफूल ग्लो कायम ठेवण्यासाठी जेनिफर अलीकडेच कॅलिफोर्नियातील एका स्किन केअर क्लिनिकमध्ये दृष्टीस पडली.
क्लिनिकमधून बाहेर पडताना जेनिफरच्या चेह-यावर स्मित हास्य होतं. यावेळी उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तिने ब्लॅक हॅट आणि डोळ्यांवर काळा चष्मा घातला होता. यावेळी तिच्या हाताच्या बोटात तिची एन्गेजमेंट रिंग दिसली.
22 ऑगस्ट 2012 रोजी अभिनेता जस्टिन थेरोक्सने जेनिफरला प्रपोज केले होते. त्यानंतर या दोघांनी साखरपुडा केला होता. या दोघांना अद्याप लग्नाची घाई नाहीये. मात्र हे कपल सध्या आपल्या फॅशनमुळे चर्चेत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा जेनिफरची खास छायाचित्रे...