आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या मुलाला सोडून दे, सूरजच्या आईचे मृत जिया खानला साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली याला १ जुलै रोजी मुंबईच्या न्यायालयाने जामीन दिला. ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला जामीन देण्यात आला आहे.

या प्रकरणी सूरजला जामीन मिळाला असला तरी त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. या पूर्वीही सूरजने जामीन मिळण्यासाठी मुंबई न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यावेळी त्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. आता त्याला जामीन मिळाल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी नक्किच सुटकेचा निःश्वास टाकला असेल.

सूरजला जामीन मिळाल्यानंतर त्याची आई जरीना वाहाब यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले, की माझ्या मुलाची या परिस्थितीतून सूटका व्हावी यासाठी गेल्या तीन आठवड्यांमध्ये मी मंदिर, मशिद आणि चर्चमध्ये नित्यनियमाने प्रार्थना केली. एका दिवस नमाज अदा करीत असताना मी जिया खानलाही माझ्या मुलाला सोडून दे अशी विनंती केली.

नमाज अदा करताना त्या जिया खानला म्हणाल्या, की जर तुझे माझ्या मुलावर खरोखरी प्रेम होते तर आज त्याची जी परिस्थिती आहे ती बघून तूला आनंद झाला असता का? आज तू माझ्यापेक्षा जास्त देवाजवळ आहेस. तू सूरजला मदत कर. त्याने खूप यातना सहन केल्या आहेत. आता त्याची सूटक कर.

या पुढील माहिती वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा