मुंबई: 'रंग रसिया' सिनेमा येत्या 7 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. रिलीजपूर्वी सिनेमाचा एक अनसेंसर्ड व्हिडिओ लीक झाला आहे. रुपकुमार राठोड आणि सुनिधी चौहान यांच्या सुमधूर आवाजात गायलेल्या गाण्यात रणदीप हुड्डा आणि नंदना सेन खूपच बोल्ड दिसून येत आहे. दोघांनी बरेच इंटीमेट सीन या गाण्यात दिल्याचे दिसते. दोघेही या सिनेमासाठी विवस्त्रदेखील झाले आहेत.
सिनेमात मुख्य साकारलेला रणदीप हुड्डा आणि नंदना सेन यांनी गाण्यात सर्व मर्यादा पार केल्या आहेत. सिनेमात रणदीप पेंटर राजा रवि वर्माचे पात्र साकारत आहे. तसेच, नंदना देवदासी सुगंधाच्या भूमिकेत आहे. सांगितले जाते, की लीक झालेले सीन्स 'काहे सताए' गाण्याचा एक भाग आहे. हे सीन सिनेमात एडिट करून दाखवण्यात आले आहेत.
दिग्दर्शक केतन मेहता दिग्दर्शित हा सिनेमा खूपच बोल्ड सीन्सने भरलेला असल्याचे सांगितले जात आहे. सिनेमात रणदीप आण नंदना शिवाय परेश रावल, विक्रम गोखले, तृप्ता पराशर, फेरेना वजीर आणि रचना शाह मुख्य भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लीक झालेल्या व्हिडिओमधील दोघांची बोल्ड केमिस्ट्री...