आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer Singh Deepika Podukone In Ramleela New Song Ang Laga Le

\'रामलीला\'तील न्यू सॉंगमधील रणवीर-दीपिकाचे सेन्शुअस लव्ह; पाहा झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा 'रामलीला' हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. रामलीलामधील न्यू सॉंग नुकतेच ऑनलाइन रिलीज करण्यात आले आहे. 'अंग लगा ले...' असा या गीताचे बोल असून अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण यांच्या 'सेन्शुअस लव्ह'ने सप्तरंग भरले आहेत.

'रामलीला' रिलीज होण्यासाठी या ना त्या कारणावरून चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे दीपिका आणि रणवीर हे दोघेही 'रामलीला'च्या प्रमोशनसाठी खूप परिश्रम घेताना दिसताहेत.

'अंग लगा ले...' या सॉंगमध्ये दीपिका- रणवीर हे दोघेंही प्रेमाच्या पावसात च‍िंब भिजलेले दाखवण्यात आले आहे. यात रणवीर आणि दीपिकाचा किसिंग सीनही आहे. गायक अदिती पॉल आणि शैल हदा यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे.

विशेष म्हणजे आता ''गोलियों की रासलीला... रामलीला' या नावाने हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, 'दीपिका आणि रणवीरचे सेन्शुअस लव्ह'