आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rumors: Austin Mahone, 17, And Selena Gomez, 21, Are In Closerelation

बीबरच्या धोक्याने दुखी झालेली सेलना पुन्हा एकदा टीनेजरच्या प्रेमात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
21 वर्षीय गायिका सेलना गोमेजला तिच्या 19 वर्षीय बॉयफ्रेंड आणि पॉप गायक जस्टिन बीबरवर आता विश्वास नाहीये. तिला वाटते, की तो कधीच चांगला वागू शकणार नाही. म्हणून आता सेलनाला तिच्या जून्या मित्राची आठवण झाली आहे. तिचा ऑस्टिन मेहोन नावाचा हा मित्र जस्टिनपेक्षा कमी वयाचा आहे. सध्या त्यांच्या जवळीक वाढल्याच्या अफवा पसरल्या आहेत. त्यांच्यामध्ये काहीही नाहीये असे स्पष्टिकरण सेलनाने दिले आहे.
मागच्या वर्षी सेलना आणि बीबर यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. एकमेकांपासून वेगळे झाले होते. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा जवळीक वाढली आणि सर्वकाही ठिक झाल्याचे चित्र दिसून येत होते. परंतु असे काही दिवस चालले आणि मागच्या आठवड्यात पनामामध्ये एक नवीन मॉडेल चॅटिल जॅफ्रिजसोबत बीबर सुट्यांचा आनंद घेताना दिसला होता.
सेलनाला जेव्हा याविषयी कळले तेव्हा तिला फार वाईट वाटले आणि तिचा बीबरवरचा विश्वास उडाला. बीबरचे नाव पुन्हा एकदा एका मॉडेलसोबत जोडण्यात येत आहे. तिचे नाव कॅलिन रसो आहे. बीबर आणि कॅलिन यांच्यामध्ये यापूर्वीसुध्दा जवळीक वाढलेली आहे.
सेलना गोमेज, जस्टिन बीबर, चॅटिंल जॅफ्रिक, ऑस्टिन मेहोन आणि कॅलिन रसो यांचे छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...