सारा लॉरेन
पाकिस्तानची सेक्सी आणि हॉट अभिनेत्री सारा लॉरेन बॉलिवूडमध्ये जम बसवत असल्याचे दिसत आहे. ती आता नवीन सिनेमा 'इश्क क्लिक' या सिनेमात शेखर सुमना मुलगा अध्यनय सुमनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
'हाल-ए-दिल'मधून करिअरला सुरूवात करणा-या अध्ययनने 'हिम्मतवाला' आणि 'हार्टलेस'सारखे सुपरफ्लॉप सिनेमाने बॉलिवूडला दिले आहेत. मात्र आता करिअरला फोकस करणार असल्याचे त्याच्याकडे बघून जाणवत आहे. त्याचा करिअरकडे बघण्याचा दृष्टीकोण बदललेला आहे. 'इश्क क्लिक'मध्ये त्याच्यासोबत लारा लॉरेन बोल्ड सीन्स देताना दिसणार आहे. ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर रोमँटिक होणार आहे. आता सारा आणि अध्ययन सिनेमात एकमेकांना किती प्रेम करतील याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे.
सारा लॉरेनने यापूर्वी 'मर्डर 3'मध्ये आपल्या सेक्सी अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले होते. या सिनेमात तिने रणदीप हुड्डासह काम केले होते. तिला या सिनेमातून बरीच लोकप्रियता मिळाली होती. आता 'इश्क क्लिक'मध्ये तिला अशीच लोकप्रियता मिळेल का? ती प्रेक्षकांना पुन्हा आपल्या अदांनी भूरळ घालेल का? हा प्रश्न आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सारा लॉरेनच्या काही हॉट आणि दिलखेचक अदा...