(सेलना गोमेज आणि जस्टिन बीबर)
तरुणाईच्या हृदयाची धडधड पाश्चिमात्य गायक जस्टिन बीबर आणि सेलेना गोमेज यांच्यामध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढली आहे. दोघे सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. सांगितले जात आहे, की अनेक प्रकरणांमध्ये चर्चेत आलेल्या बीबरने सेलेनाला शब्द दिला आहे, की तो आता स्वत:चा स्वभाव बदलेल. बीबर त्याचे वागणे बदलणार आहे. सेलेनानेसुध्दा त्याला पूर्ण सपोर्ट करण्याचा निश्चय केला आहे.
21 वर्षीय सेलेना आणि 20 वर्षीय जस्टिन यांचे काही महिन्यापूर्वी ब्रेकअप झाले होते. दोघे एकमेकांना दुर्लक्षित करत होते. त्यादरम्यान बीबर मात्र अनेक तरुणींसोबत दिसला. तो नशेत वेगाने गाडी चालण्याच्या प्रकरणातसुध्दा अडकला होता. बीबर आणि सेलेना यांच्याममध्ये अनेकदा ब्रेकअप झालेले आहे. मात्र काही कालावधीनंतर पुन्हा एकत्र येण्याच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. यावेळीही असेच झाले आहे. मात्र दोघे एकत्र राहिले तर त्यांच्यामध्ये खूप प्रेम असल्याचे जाणवते. कारण बीबर आणि सेलेना कोणत्याही ठिकाणी एकत्र दिसतात. प्रत्येक क्षणाला रोमँटिक बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
बीबर आणि सेलेना यांच्यामध्ये पूर्वीसुध्दा अनेकदा पॅचअप झालेले आहे. त्यावेळी त्यांना एकमेकांसोबत घालवलेले क्षण बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...