आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On Location: 'Ragini MMS 2'साठी सनीने शुट केले बोल्ड सीन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन पुन्हा एकदा 'रागिनी MMS 2' या आगामी सिनेमामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच तिने या सिनेमासाठी काही सीन्स शुट केले आहेत. त्यामध्ये सनी खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. तसे पाहता सनीचा हा सिनेमा बोल्ड असल्याने बराच चर्चेत आहे. त्यात भर म्हणून आता सनीनेसुध्दा हे सीन्स शुट केले आहेत. तिचे चाहतेसुध्दा हा सिनेमा रिलीज होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.
सिनेमात सनी लिओनचे बोल्ड सीन्स व्यतिरिक्त तिचा अभिनेत्री संध्या मृदुसोबतसुध्दा एका किसींग सीन समोर आला आहे. संध्यासोबतचा सनीचा एका किसींग सीनमुळे सध्या चर्चेला उधाण आले आहे. सिनेमातील हे सीन्स समोर आल्यानंतर कदाचित या सिनेमाला हिट होण्यास काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळावी अशी सनीलासुध्दा अपेक्षा आहे. सनीने सांगितले, की 'रागिनी MMS 2'मध्ये सनीचा असा अवतार सर्वांसमोर येणार आहे जो आतापर्यंत प्रेक्षकांनी कधीच पाहिला नव्हता.
सनी लिओनचा 'रागिनी MMS 2' एक हॉरर सिनेमा असून 2011मध्ये आलेल्या 'रागिनी MMS' सिनेमाचा सीक्वल आहे. सिनेमात सनी भितीदायक अवतारात दिसणार आहे. अलीकडेच रिलीज झालेली या सिनेमाची 'चार बोटल व्होडका' आणि 'बेबी डॉल' ही गाणीही सर्वधिक चर्चेत आहेत. 'रागिनी MMS 2'चे दिग्दर्शक भूषण पटेल असून एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. सनी अभिनीत हा सिनेमा 21 मार्च रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'रागिनी MMS 2'चे अलीकडेच समोर आलेले काही बोल्ड सीन्स...