आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबी टाऊनमधील बहुतेक अभिनेत्री बिकिनीमुळे अनेकदा वादाच्या भोवर्यात सापडल्या परंतु बिकिनीपासून त्या वेगळ्या होऊ शकलेल्या नाहीत. कारण, बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळातही अनेक अभिनेत्रींनी बिकिनी परिधान केली होती. त्यात नूतन आणि शर्मिला टागोर यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.
1958 मध्ये रिलिज झालेल्या 'दिल्ली का ठग'मध्ये नूतने बिकिनी परिधान केली होती. तर बेगम करीनाच्या सासूबाई शर्मिला टागोर यांना बॉलिवूडची ग्लॅमरस हिरोईन म्हणून ओळखले जात होते. बॉलिवूडमध्ये बिकिनीचा ट्रेंड सुरु करणार्या शर्मिला टागोर पहिल्या अभिनेत्री आहेत. शर्मिला टागोर यांनी एका मॅगझिनच्या कव्हरपेजसाठीही बिकिनीत पोज दिली होती.
'टशन'मध्ये बिकिनी परिधान करून चाहत्यांना जलवा दाखवणारी बेगम करीनाने 'हीरोइन'मध्ये बिकिनी परिधान करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आपण कोणत्याही चित्रपटात बिकिनी परिधान करणार नसल्याचे सोनाक्षी सिन्हाने जाहीर केले होते.
चित्रपटात मुख्य अभिनेत्रीने बिकिनी परिधान केली असेल तर त्या चित्रपटातील चांगली पब्लिसिटी होती, असे म्हटले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.