आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shahrukh Khan Son Aaryan Too Protective About Younger Brother Abram

शाहरुखचे करण-अर्जुन; अबरामसाठी Protective दिसला आर्यन, शेअर केला हा फोटो...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शाहरुख खान सध्या आपली पत्नी गौरी खान आणि 3 मुला-मुलींसह फ्रान्समध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. आपल्या कजिन्ससोबत असलेले आर्यन, सुहाना आणि अबराम रोज सोशल मीडियावर हॉलिडे पिक्स पोस्ट करत आहेत. त्यात शनिवारी आर्यनने आपला लहान भाऊ अबरामसोबत एक फोटो शेअर केला. त्यामध्ये त्याने आपल्या चिमुकल्या भावाच्या डोक्यावर हात ठेवला आहे. इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना आर्यनने 'कुणीही माझ्या भावावर हात ठेवू शकत नाही.' (Nobody lays a hand on my brother) असे लिहिले. हा फोटो पाहून तो आपल्या भावाला प्रोटक्ट करतोय असे दिसून येते. 


शाहरुख खानने यापूर्वी अनेकवेळा मुलाखतीमध्ये आपल्या मुलांच्या चित्रपटांत येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांना हवे असल्यास ते चित्रपटांमध्ये येऊ शकतात. परंतु, आधी त्यांना आपले शिक्षण पूर्ण करावे लागेल असे शाहरुख म्हणाला होता. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, सुहाना अॅक्टिंगमध्ये आपले करिअर घडवू इच्छिते. तिने अनेक थिएटरमध्ये नाटक सादर केले आहेत. तिला स्पोर्ट्सचा देखील छंद आहे. तर दुसरीकडे, आर्यन सुद्धा फिल्म मेकिंगमध्ये कोर्स करत आहे. 
- शाहरुख खानने आपले आगामी चित्रपट 'Zero' चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. याचे चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले. शाहरुखसोबत या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरीना कैफ लीड रोल करत आहेत.


पुढील स्लाइड्सवर सुहानाचा बिकिनी पिक आणि इतर PHOTOS...